औरंगाबाद : हर्सूल कारागृहातील दोन कैद्यांकडे मोबाईल आढळला आहे. खून प्रकरणातील संशयित आणि लुटमरीतील प्रकरणासाठी कारागृहात असलेल्या गुन्हेगारांना कडे मोबाईल आढळल्याने खळबळ उडाली आहे.या दोन कैद्यांकडे सापडलेले मोबाईल जप्त करण्यात आले आहे.
अक्षय आठवले आणि विजय गोयर हे या दोन कैद्यांची नावे आहेत, २३ जुलै रोजी रात्री अंगझडती घेत असताना दोघांकडे मोबाईल सापडला. यावरून त्यांच्याविरुद्ध हर्सूल कारागृह कर्मचारी अमित गुरव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
यापैकी आठवले याने घटीच्या वार्ड क्र. दहामध्ये उपचार सुरू असताना त्यानी बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांना बोलवुन त्याच्या साथीदारसह घाटीतून पळ काढला होता. हर्सूल कारागृहातील कैद्यांकडे मोबाईल सापडल्याने सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.