न्यूयॉर्क । कोरोना लस उत्पादक मॉडर्नाचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बॅन्सेल यांचा विश्वास आहे की,” कोविड -19 महामारी पुढील एका वर्षात पूर्णपणे संपेल.” त्यांनी म्हटले आहे की,” जागतिक मागणीनुसार, आता लसीचे उत्पादन वेगाने होत आहे आणि यामुळे या साथीवर लवकरच मात केली जाईल.”
मात्र, कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये, आतापर्यंत केवळ 2% लोकसंख्येला लसीचा डोस देण्यात आला आहे. म्हणून, जर आपण ग्राउंड लेव्हलवरील लसीकरणाबाबत चर्चा केली तर स्टीफन बॅन्सेलचे हे स्टेटमेंट कमकुवत दिसते.
मॉर्डेनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बॅन्सेल यांनी गुरुवारी स्विस वृत्तपत्र ‘न्यू झुएरचेर झीतुंग’ ला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितले आहे. ते म्हणाले,”जगभरात लसीच्या निर्मितीमध्ये तेजी आली आहे. अशाप्रकारे, पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत ही लस संपूर्ण जगाच्या लोकसंख्येला उपलब्ध केली जाईल. परिस्थिती सामान्य कधी होईल? या प्रश्नावर बॅन्सेल म्हणाले,”आम्हांला मला आशा आहे की, वर्षभरात परिस्थिती पूर्वपदावर येईल.”
त्याचबरोबर स्टीफन बॅन्सेल म्हणाले की,”ज्यांना लस मिळेल ते येत्या काळात या विषाणूपासून सुरक्षित राहतील. त्याच वेळी, ज्यांना ही लस मिळणार नाही, त्यांना डेल्टा व्हेरिएन्टमुळे आजारी पडण्याचा किंवा रुग्णालयात दाखल होण्याचा धोका कायम राहील.”
बूस्टर शॉटची देखील गरज भासू शकेल
बॅन्सेल यांनी असेही सांगितले की,”येत्या काही दिवसांमध्ये लोकांना लसीच्या बूस्टर डोसची गरज भासू शकेल. यासाठी उपलब्ध असलेल्या लसीच्या अर्ध्या डोसच्या सूत्रावर कंपनी काम करत आहे. त्यांनी असेही सांगितले की,” त्यांची कंपनी लसीच्या ‘डेल्टा ऑप्टिमाइझ्ड व्हेरिएंट’ वरही काम करत आहे, जे 2022 मध्ये बूस्टर शॉट्सचा आधार असेल.”