Modi Express For Ganeshotsav 2025 : गणेशोत्सवानिमित्त मोफत प्रवास अन जेवण; कोकणवासीयांसाठी धावणार मोदी एक्सप्रेस

Modi Express For Ganeshotsav 2025
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Modi Express For Ganeshotsav 2025 । गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणवासीयांसाठी मोदी एक्सप्रेस धावणार आहे. मात्र यंदा एक नाही, तर दोन दोन मोदी एक्सप्रेस कोकणात धावणार आहेत. मंत्री नितेश राणे यांनी याबाबत माहिती दिली आहे. मागील १२ वर्षांपासून हजारो गणेश भक्तांसाठी ही विशेष रेल्वे सेवा मोफत चालवली जात आहे. यंदा या मोफत रेल्वे सेवेचे हे १३ वी वर्ष आहे. विशेष बाब म्हणजे या मोदी एक्सप्रेस मध्ये भक्तांसाठी मोफत जेवण व पाण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे.

नितेश राणे यांनी याबाबत माहिती देताना म्हंटल कि, यावर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोकणातील लोकांनी भाजप आणि राणे कुटुंबाला पूर्ण पाठिंबा दिला. या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आम्ही मोदी एक्सप्रेस (Modi Express For Ganeshotsav 2025) या रेल्वेसेवेचा आणखी विस्तार करत आहोत. तसेच या दोन्ही गाड्यांमधील सर्व प्रवाशांना मोफत जेवण आणि पिण्याचे पाणी देखील मिळेल, जेणेकरून त्यांचा प्रवास आरामदायी होईल. ही फक्त एक यात्रा नाही, तर कोकणच्या मातीशी आणि गणपती बाप्पाच्या दरबाराशी जोडण्याचे एक साधन आहे. प्रत्येक कोकणवासीयाने त्यांच्या गावी पोहोचून कोणत्याही तणावाशिवाय उत्सव साजरा करावा अशी आमची इच्छा आहे.

कसं असेल रेल्वेचे वेळापत्रक – Modi Express For Ganeshotsav 2025

पहिली ट्रेन : कोकणाकडे जाणारी पहिली मोदी एक्सप्रेस दादर स्टेशन (प्लॅटफॉर्म १४) येथून शनिवार, २३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सुटेल. रत्नागिरी आणि कुडाळ येथे या ट्रेनला थांबा असेल आणि शेवटचे स्टेशन सावंतवाडी असेल.

दुसरी ट्रेन : कोकणाकडे जाणारी दुसरी मोदी एक्सप्रेस दादर स्टेशन (प्लॅटफॉर्म १४) येथून रविवार, २४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सुटेल. वैभववाडी आणि कणकवली या स्थानकांवर या ट्रेनला थांबा असेल. या दोन्ही रेल्वे मधील आसन क्षमता मर्यादित असल्याने प्रवाशांनी वेळेत तिकिटे बुक करणे महत्वाचे आहे.

कधीपासून कराल बुकिंग?

तिकीट वाटप 18 ऑगस्ट 2025 पासून सुरू होईल. इच्छुक प्रवाशांनी आपल्या मंडळ अध्यक्षांकडे नाव नोंदणी करावी. ‘प्रथम येईल त्याला प्राधान्य’ या तत्त्वावर बुकिंग होईल. गणेशोत्सवादरम्यान कोकणाकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये नेहमीच गर्दी असते, अशावेळी हि मोदी एक्सप्रेस हजारो प्रवाशांना मोठा दिलासा देईल.