कोरोना परिस्थितीतील सर्वात अपयशी पंतप्रधान कोण ? मोदींना मिळाले ९० टक्के मतं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतात कोरोना विषानूने अक्षरशः थैमान घातले आहे. एकीकडे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना दुसरीकडे औषधं, ऑक्सिजन बेड्स आणि लसींच्या तुटवड्यामुळे अनेक स्तरांमधून केंद्र सरकारच्या ढीसाळ कारभारावर टीका केली जात आहे. जगभरात करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमधील नेत्यांसंदर्भात घेण्यात आलेल्या एका ऑनलाइन जनमत चाचणीमध्ये सर्वात वाईट कामगिरी करणारा नेता कोण असा प्रश्न विचारण्यात आला होता. या जनतमचाचणीमध्ये ९० टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत दिलं आहे.

अमेरिकेतील ‘द कॉन्व्हर्सेशन’ या न्यूज वेबसाईटने ट्विटरवर नुकताच एक महत्त्वाचा पोल घेतला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील इतर सर्व नेत्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती हाताळण्यामध्ये सर्वात अयशस्वी ठरल्याचा निष्कर्ष या पोलमधून समोर आला आहे.

या पोलमध्ये जवळपास 75 हजारहून अधिक लोकांनी आपली मते नोंदवली आहेत. 75,450 लोकांपैकी जवळपास 90 टक्क्यांहून अधिक मते भारताचे पंतप्रधान मोदींना मिळाली आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देखील मोदींनी मागे टाकलं आहे. यामध्ये ट्रम्प यांना 4.9 टक्के मते मिळाली आहेत.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment