Saturday, March 25, 2023

मोदींचे नवे मंत्रिमंडळ जाहीर; पहा कोणाच्या पदरी कोणतं खातं

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल करण्यात आला असून अनेक खात्यांमध्ये उलथापालथ केली गेली आहे. तब्बल 12 मंत्र्यांचे राजीनामे मोदींकडून घेण्यात आले असून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

केंद्रिय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा घेतलेला राजीनामा चर्चेचा विषय ठरला. तर दुसरीकडे महाराष्ट्रातुन माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे, खासदार कपिल पाटील, खासदार भागवत कराड आणि खासदार भारती पवार यांच्याकडे महत्त्वाची खाती सोपवण्यात आलीत. पाहुयात कोणाला कोणतं खाते मिळाले .

- Advertisement -

कॅबिनेट मंत्री

1. राजनाथ सिंग- केंद्रीय संरक्षणमंत्री

2. अमित शाह – गृह, सरकार

3. नितीन गडकरी- केंद्रीय रस्ते महामार्ग आणि वाहतूक मंत्रालय

4. निर्मला सीतारामण- केंद्रीय अर्थमंत्री आणि केंद्रीय कॉर्पोरेट कामकाज मंत्री

5. नरेंद्र सिंग तोमर- केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री

6. सुब्रमण्यम जयशंकर- केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री

7. अर्जुन मुंडा- केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री

8. स्मृती इराणी- केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री

9. पियूष गोयल – वस्त्रोद्योग मंत्री

10. धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षणमंत्री, केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजक मंत्री

11. प्रल्हाद जोशी- केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री, केंद्रीय खाण आणि कोळसा मंत्री

12. नारायण राणे- केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उपक्रम मंत्री

13. सर्बानंद सोनोवाल- आयुष मंत्री, केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री

14. मुख्तार अब्बास नक्वी- केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री

15. वीरेंद्र कुमार- केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री

16. गिरीराज सिंग- केंद्रीय ग्रामविकास मंत्री, केंद्रीय पंचायत राज मंत्री

17. ज्योतिरादित्य शिंदे – हवाई वाहतूक मंत्री

18. रामचंद्र प्रसाद सिंग, केंद्रीय पोलाद मंत्री

19. आश्विनी वैष्णव- केंद्रीय रेल्वेमंत्री, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्री

20. पशुपती कुमार पारस- नवे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री

21. गजेंद्र सिंग शेखावत- नवे केंद्रीय जल शक्ती मंत्री

22. किरेन रिजिजू- केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री

23. राज कुमार सिंग- केंद्रीय ऊर्जामंत्री

24. हरदीपसिंह पुरी- पेट्रोलियम मंत्री

25. मनसुख मांडवीय- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री

26. भुपेंद्र यादव – पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री आणि कामगार आणि रोजगार मंत्री

27. डॉ. महेंद्र नाथ पांडे – अवजड उद्योगमंत्री

28. पार्शोत्तम रुपाला – मत्स्यपालन, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री

29. जी. किशन रेड्डी – सांस्कृतिक, पर्यटन आणि पूर्वोत्तर प्रदेशाचे विकास मंत्री

30. अनुराग ठाकूर- क्रीडामंत्री, माहिती प्रसारण मंत्री