Tuesday, January 31, 2023

मोदी सरकारची मोठी घोषणा!! 1.5 वर्षात 10 लाख नोकऱ्या देणार

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील बेरोजगारांना मोदी सरकारने एक खुशखबर दिली आहे. येत्या दीड वर्षात तब्बल 10 लाख नोकऱ्या देण्याचा केंद्राचा मानस आहे. पीएमओ कार्यालयाने याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे देशभरातील लाखो बेरोजगार युवकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नरेंद्र मोदी यांच्या पीएमओ कार्यालयाने ट्विट करत म्हंटल की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विभागांमध्ये काम करणाऱ्यांच्या संख्याबळाचा आढावा घेतला. त्यानंतर सर्वच खात्यातील मंत्रालयांना आणि विभागांना पदभरती करण्याबाबतच्या सूचना दिल्यात. पुढील दीड वर्षात 10 लाख लोकांची भरती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

गेल्या काही वर्षांपासून कोरोनामुळे आधीच काही जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर दुसरीकडे महागाई मात्र झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा 10 लाख नोकऱ्या उपलब्ध करण्याचा निर्णय नक्कीच युवकांना नवी ऊर्जा देणारा ठरेल.