मोदी सरकार देतेय स्वस्तात सोने; समजून घ्या कसा कमवायचा नफा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) सॉव्हरेन सोन्याच्या बाँडच्या पुढील सीरीजविषयीची माहिती दिली आहे. आरबीआयने यासाठी प्रति ग्रॅम ४,६७७ रुपये निश्चित केले आहेत. सॉव्हरेन गोल्ड बाँड २०२०-२१ ची तिसरी सीरीज आजपासून सुरु होत आहे. १२ जूनपर्यंत गुंतवणूकदारांना या योजनेत सोने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. केंद्रीय बँकेने एप्रिलमध्येच जाहीर केले होते की, या योजनेंतर्गत सप्टेंबरपर्यंत गुंतवणूकदारांना ६ वेळा गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. आरबीआय हे केंद्र सरकारच्या वतीने जाहीर करेल. अशा परिस्थितीत तुम्हालाही सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्हीही या योजनेचा फायदा घेऊन तुम्ही मोठा नफा कमवू शकता. सरकारची ही योजना काय आहे? जाणून घेउयात.

ही योजना नोव्हेंबर २०१५ मध्ये सुरू करण्यात आली होती. याचा उद्देश सोन्याची फिजिकल मागणी कमी करणे तसेच सोन्याच्या खरेदीसाठी वापरण्यात येणारी घरगुती बचत ही आर्थिक बचतीत हस्तांतरित करणे ही आहे. घरात सोनं खरेदी करण्याऐवजी जर तुम्ही सॉव्हरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक केली तर तुम्ही करदेखील वाचवू शकाल.

यांना सवलत मिळेल
आरबीआयने म्हटले आहे की, ऑनलाइन अर्ज करणारे आणि पैसे देणार्‍या गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम ५० रुपये सूट मिळेल. अशा गुंतवणूकदारांना एक ग्रॅम सोन्याची खरेदी करण्यासाठी ४,६२७ रुपये मोजावे लागतील. चला तर मग या योजनेची खास वैशिष्ट्ये आणि त्यामध्ये गुंतवणूक कशी करावी हे जाणून घेऊयात.

सोने खरेदी करण्याची मर्यादा किती आहे
एका आर्थिक वर्षात एक व्यक्ती किमान १ ग्रॅम आणि जास्तीत जास्त ४ किलो किंमतीचे बॉन्ड खरेदी करू शकते. मात्र एखाद्या, ट्रस्टसाठीची खरेदीची कमाल मर्यादा ही २० किलो इतकी आहे.

२.५ टक्के रिटर्नची हमी
सरकारच्या या योजनेमध्ये सोन्यातील तेजीचा फायदा मिळू शकतो. यात वर्षाकाठी २.५ टक्के व्याजही मिळते. हा व्याज दर ६ महिन्यांनी गुंतवणूकदाराच्या बँक खात्यात जमा केले जाईल. यामध्ये एकूण भांडवलाच्या मॅच्युरिटीवर अंतिम व्याज दिले जाते. मॅच्युरिटीचा कालावधी हा ८ वर्षे आहे, मात्र ५ वर्ष, ६ वर्षे आणि ७ वर्षांचा पर्याय देखील उपलब्ध आहे. सोन्याचा बाजारभाव खाली आला तर यात भांडवलाचे नुकसान होण्याची शक्यताही असते.

कुठे खरेदी करावी?
आपण हे सोन्याचे बाँड ऑनलाइन खरेदी करू शकता. या व्यतिरिक्त ही बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एसएचसीआयएल), एनएसई आणि बीएसई सारख्या निवडक पोस्ट ऑफिस आणि स्टॉक एक्सचेंजद्वारे देखील याची विक्री केली जाईल.

पुढील बाँड कधी जारी होईल?
चौथी सीरीज: ६ जुलै ते १० जुलै सब्सक्रिप्शनसाठी खुला असेल. त्याचा हप्ता १४ जुलै रोजी जाहीर केला जाईल.
पाचवी सीरीज: ३ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान सब्सक्रिप्शनसाठी खुला असेल. त्याचा हप्ता ११ ऑगस्ट रोजीजाहीर केला जाईल.
सहावी सीरीज: ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान सब्सक्रिप्शनसाठी खुला असेल. त्याचा हप्ता ८ सप्टेंबर रोजी जाहीर केला जाईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment