हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपले केंद्र सरकार हे महिलांसाठी नेहमीच नवनवीन योजना आणत असतात. अशातच सरकारने महिलांसाठी एक खास योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना पहिल्या वर्षी महिन्याला 7 हजार रुपये दुसऱ्या वर्षी 6 हजार रुपये आणि दुसऱ्या वर्षी 5000 रुपये मिळणार असल्याचे सांगितलेले आहे. महिला या आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात. यासाठी सरकारने ही योजना आणलेली आहे. देशपातळीवर ही योजना राबवली जाणार आहे. मोदी सरकारने सध्या हरियाणामध्ये ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेचे नाव बिमा सखी योजना असे आहे. परंतु हरियाणा नंतर संपूर्ण देशभरात ही योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे.
योजनेच्या अटी
योजनेअंतर्गत वर्षात महिन्याला 7000 रुपये घेणार विद्या वेतन मिळणार आहे. दुसऱ्या वर्षी 6000 रुपये देण्यात येणार आहेम तर तिसऱ्या वर्षी 5000 रुपये विद्या वेतन देण्यात येणार असल्याचे सांगितलेले आहे. अशाप्रकारे महिलांना तीन वर्षात 2 लाख 26 हजार रुपये विद्यावेतन मिळणार येणार आहे. असे सरकारने सांगितलेले आहेत. परंतु या योजनेत सहभागी होण्यासाठी सरकारने काही अटी देखील दिलेल्या आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या योजनेचा अर्ज करण्यासाठी महिलेचे वय हे 18 ते 70 वर्ष दरम्यान असते गरजेचे आहे. तसेच ती महिला किमान दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. ज्या महिलेच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती एलआयसी एजंट आहे. त्या कुटुंबातील महिलांना या योजनेत सहभाग घेता येणार नाही.
योजनेसाठी कागदपत्र
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना त्यांचा पासपोर्ट साईज फोटो, पॅन कार्ड, आधार कार्ड, वयाचा पुरावा, शिक्षणाचा पुरावा बँकेचे तपशील यासारखे कागदपत्रे जोडावे लागणार आहेत. देशभरात 3 वर्षात दोन लाख किंवा सचिन नियुक्ती करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. या योजनेत सहभाग झालेल्या महिलांना तीन वर्षाच्या प्रशिक्षणानंतर एलआयसी एजंट म्हणून काम करता येईल.
हे तीन वर्षाच्या प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिला इतर एजंट परवाने कमिशनवर काम करतील. परंतु या महिलांना एलआयसी कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून घेता येणार नाही. तसेच एलआयसी कर्मचाऱ्यांना मिळणारे इतर फायदे देखील त्यांना मिळणार नाही