हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या विस्ताराच्या मंत्रिमंडळात देशासह महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचा समावेश केला जाणार आहे. या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “केंद्रात असलेल्या मोदी सरकारने गेली सात वर्षे फक्त एन्जॉय करण्याचं काम केलं आहे. त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या सत्तेचा आनंद फक्त उपभोगण्याचे काम केले आहे.,” अशा शब्दात पटोले यांनी टीका केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात खातेबद्दल केले जाणार आहे. याबाबत पटोले यांनी टीका करताना म्हंटल आहे कि, मोदीजी आपण मंत्रिमंडळाचा विस्तार करा अथवा करू नका. त्यामुळे काहीही फरक पडणार नाही. या सरकारने लोकांना अक्षरशः बरबाद करण्याचे काम केले आहे. त्यांच्या अनेक मंत्री सांगतात कि, त्यांच्याकडे काही महत्वाच्या फाईलही दिल्या जात नाहीत.
मोदी यांनी आतापर्यंत देशाचे नुकसान केले आहे. त्यांनी लोकतंत्र संप्वण्याचे काम केले आहे. फेरबदल करूनही हि पापे त्यांना धुवून काढता येणार नाहीत. हे त्यांनी लक्षात घावे, अशी खरमरीत टीकाही यावेळी पटोले यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात भाजपच्या नेत्यांकडून दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या बैठकीवर टीका केली होती. आज काँग्रेसकडून मोदींच्या मंत्री मंडळाच्या विस्तारावर टीका केली आहे.