नवी दिल्ली | भारतीय लष्कर २७ हजार जवानांना सेवेतून कमी करण्याची शक्यता आहे. लष्कराशी थेट संबंध नसलेल्या जवानांची सेवा सरकारकडून संपुष्टात आणली जाऊ शकते. यामुळे लष्कराचे जवळपास १६ अब्ज रुपये वाचतील, असा अंदाज आहे.
लष्करात सध्या १२.५० लाख जवान कार्यरत आहेत. त्यांच्या वेतन आणि इतर भत्त्यांवर लष्कराला मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे लष्कराचं आकारमान कमी करण्याचा विचार सुरू आहे. टेरिटोरिअल आर्मी, सैनिकी शाळेतील अधिकारी,बॉर्डर रोड ,नॅशनल कॅडेट कॉप्स, अशा विभागातले जवान कायमस्वरूपी तैनात असलेल्या जवानांमध्ये होत नाही. २७ हजार जवानांच्या कपातीसोबतच कार्यक्षमता आणि उपयोग्यता वाढवण्यासाठी लष्कराची पुनर्रचना करण्याची शिफारसदेखील करण्यात आल्याची आहे.
कंपोजिशन टेबल-२ च्या अंतर्गत येणाऱ्या संस्थांमध्ये सेवा देत असलेल्या जवानांना माघारी बोलवण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी संरक्षण मंत्रालयाकडे पाठवण्यात आले आहे. परंतु आत्ताची परिस्थिती बगता हा निर्णय कितपत योग्य आहे हे वेळच ठरवेल.