हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नुकताच अर्थ मंत्रालयाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आतापर्यंतच्या काळात पहिल्यांदाच मंत्रालयाने एका वरिष्ठ महिला IRS अधिकाऱ्याला त्यांचे नाव आणि लिंग बदलण्याची परवानगी दिली आहे. एम अनुसूया (M Anusuya) असे संबंधित अधिकाऱ्याचे नाव असून ते हैदराबादच्या सीमाशुल्क उत्पादन आणि सेवा कर अपीलीय न्यायाधिकरण (CESTAT) च्या मुख्य आयुक्त कार्यालयात सह आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. एम अनुसूया यांनी आपले नाव आणि लिंग बदलण्याची परवानगी मागितली होती. यालाच मोदी सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी आपले नाव बदलून एम अनुकथिर सूर्य असे ठेवले आहे.
सर्वात प्रथम 2013 साली सूर्या यांनी चेन्नईमध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. यानंतर त्यांना 2018 मध्ये उपायुक्तची जबाबदारी देण्यात आली. त्या गेल्याच वर्षी हैदराबादमध्ये पोस्टिंगवर रुजू झाल्या होत्या. त्यांच्यासाठी लिंग बदल शस्त्रक्रिया करणे प्रचंड आव्हानात्मक होते. यासाठी लागणारा खर्च ही अधिक होता. तसेच, या संपूर्ण प्रक्रियेसाठी परवानगी सर्वात जास्त अवघड काम होते. कारण की, लिंग बदलण्याच्या शस्त्रक्रियेसाठी कायदेशीर परवानगी काढावी लागते.
महत्त्वाचे म्हणजे, त्यासाठी प्रशासनाकडे अर्ज करावा लागतो. त्यानंतर या अर्जावर कायदेशीर प्रक्रिया होत असते. तसेच, एकदा एखाद्या व्यक्तीने लिंग बदलण्याचा निर्णय घेतला की त्याला प्रतिज्ञापत्राचा मसुदा तयार करावा लागतो. या पत्रात लिंग बदल घोषित करावा लागतो. ही सर्व प्रक्रिया करण्यासाठीच त्यांना मोदी सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे एम अनुसूया यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय लिंग आणि नाव बदलण्याची प्रक्रिया पूर्ण करता आली आहे.