प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये; असं करा बॅलेन्स चेक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्याच्या खात्यात २ हजार रुपये दिले जाणार आहेत. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजने अंतर्गत (PKSY) पुढच्या महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी ३ हफ्त्यांमध्ये ६ हजार रुपये दिले जाणार आहेत. आतापर्यंत या योजनेअंतर्गत १० कोटी शेतकऱ्यांना जोडण्यात आलं आहे. १ ऑगस्टपासून सरकार शेवटचा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे.

असं तपासा तुमचं नाव
नव्या वर्षात तुम्ही यासाठी अर्ज केला असेल तर लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव आलंय का हे पाहण्यासाठी pmkisan.gov.in वर तुम्हाला सर्व माहिती मिळेल. याच संकेतस्थळावर जाऊन कोणती माहिती चुकीची तर नाही, हे आधी तपासून पाहा. फार्मर कॉर्नरवर क्लिक केल्यानंतर बेनिफिशरी स्टेटसवर क्लिक करा. यानंतर तिथे आधार नंबर, अकाऊंट नंबर आणि फोन नंबरचा पर्याय दिसेल. इथे तुम्ही भरलेली माहिती योग्य आहे का ? हे तपासता येईल. जर तुमचा अर्ज जर आधार, मोबाईल नंबर किंवा बॅंक खाते या कारणामुळे राहीला असेल तर ते डॉक्युमेंट ऑनलाईन अपलोड करु शकता. अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. जर तुम्ही अर्ज केला असाल तर लाभार्थ्यांच्या यादीत तुमचं नाव तपासून पाहा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”