‘या’ एका कारणामुळं मोदी सरकारने PubG बंद केलं नाही; काँग्रेसची उपरोधिक टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । मोदी सरकारकडून ४७ अॅप्सवर बंदी घातल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी मोदी सरकारला ‘PubG’ वरून उपरोधिक टोला हाणलाय. खरंतर मोदी सरकारला पबजी या ऑनलाईन व्हिडिओ गेम अॅपवर बंदी आणायची होती, पण मग तरुण गेम खेळायचं थांबले तर बेरोजगारीबद्दल बोलायला लागतील, अशी भीती त्यांना वाटली, असा उपरोधिक टोला अभिषेक मनु सिंघवी यांनी मोदी सरकारला लगावला आहे.

‘खरं म्हणजे मोदी सरकारला PubG वर बंदी आणायची होती. पण तरुणाईसमोर कल्पनारम्य आभासी जगच नसेल तर ते खऱ्याखुऱ्या जगाबद्दल बोलायला . लागलील, उदाहरणार्थ नोकऱ्या… आणि मग गोजी होईल’ असं ट्विट करताना अभिषेक मनु सिंघवी यांनी #pubgban हा हॅशटॅग वापरला आहे.

भारत चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने सुरुवातीला टिक-टॉकसह ५९ अॅप्सवर बंदी घातली होती. त्यानंतर सोमवारी, चीनशी संबंधित कंपन्यांवर कारवाई करत भारत सरकारने आणखीन ४७ अॅपवर बंदी घालण्यात आल्याचं जाहीर केलं. या अ‍ॅप्सवर वापरकर्त्यांचा डाटा चोरीला जात असल्याचं सांगत भारत सरकारनं ही कारवाई केली आहे.

या बॅन केलेल्या अॅपशिवाय अजूनही भारत सरकारची नजर २७५ परदेशी अ‍ॅप्सवर आहे. यामध्ये PUBG, Tencent, Xiaomi आणि इतरही ऍपचा समावेश आहे. याशिवाय मीटू, LBE टेक, परफेक्ट कॉर्प, सिना कॉर्प, नेटेज गेम्स आणि यजु ग्लोबलचाही या यादीत समावेश आहे. मुख्य म्हणजे PUBG ला भारतात असणारी एकंदर लोकप्रियता आणि हा गेम खेळण्यासाठी हे ऍप वापरणाऱ्यांची संख्या पाहता मोठ्या वर्गात निराशाही पाहायला मिळत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment