उद्धव ठाकरे हे सक्षम मुख्यमंत्री असल्याचे पटल्यामुळेच मोदी गुजरातला गेले असावे ; संजय राऊत यांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : तौक्ते चक्रीवादळानंतर मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आता राज्य सरकारकडून नुकसानीचे पंचनामा करण्याचे काम सुरु करण्यात आलेले आहे. अशात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी येणार असल्याची शक्यता काल वर्तविली जात होती. मात्र, ते गुजरातला पाहणी करण्यासाठी गेले. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला असून “महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरात सरकार कमजोर आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती हाताळन्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सक्षम असल्याचे पटल्यामुळेच मोदीजी महाराष्ट्रात न येत गुजरातला गेले असावेत,” असा टोला राऊत यांनी लगावला.

खासदार संजय राऊत यांनी माध्यम प्रतिनिधींशी आज संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “तौक्ते चक्रीवादळानंतर झालेल्या नुकसानीबाबत माहिती घेण्यासाठी आज सर्वच राजकीय पक्षांकडून पाहणी करण्याचे काम केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हि महाराष्ट्रात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी येणार आहेत. मात्र, त्यांनी प्रथम गुजरातला जाणे पसंद केले. त्यांना महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातचे मुख्यमंत्री अधिक सक्षम असल्याचे वाटले असावे. म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. कदाचित केंद्रीयमंत्री अमित शहाही गुजरातचा दौरा करतील, असाही टोला राऊत यांनी लगावला.

तौक्ते चक्रीवादळानंतर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र व गुजरातचे नुकसान झालेआहे. महाराष्ट्रातील नुकसानीत सर्वाधिक फटका हा अलिबाग व सिंधुदुर्गला बसला असल्याने आजपासून भाजपचे नेते विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व देवेंद्र फडणवीस हे अलिबाग व सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दोन दिवसांचा दौरा करणार आहेत. या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

Leave a Comment