मोदी, शहा, डोवाल यांच्या जीवाला धोका? साध्वी प्रज्ञासिंहने केला दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । राज्यकर्त्यांविरुद्ध देशभरातून नाराजीचा सूर उमटत असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या फोटोवर फुली मारलेलं पत्र साध्वी प्रज्ञासिंह यांच्यापर्यंत पोहचवण्यात आलं आहे. या पत्रामध्ये योगी आदित्यनाथ आणि साध्वी प्रज्ञासिंह यांचे फोटोही पहायला मिळत आहेत. या पत्रासोबतच पावडरसारखा पदार्थही लिफाफ्यात आढळून आला आहे.

याप्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी हे पत्र ताब्यात घेतलं आहे. शिवाय, त्यातील संदिग्ध पावडरची तपासणी करण्यासाठी ते प्रयोगशाळेत (एफएसएल) देखील पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी नोंद करून घेतली असुन, पत्र पाठवणाऱ्यांचा शोध सुरू आहे.

दरम्यान माझ्या जीवाला धोका आहे, या अगोदर देखील अशा प्रकारचे धमकी पत्र मला आले होते, तेव्हा देखील मी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. मात्र आजपर्यंत याबद्दल कोणतीच कारवाई झाली नसल्याचे साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले आहे. आता या प्रकरणात पोलीस लक्ष देऊन नक्की काय कारवाई करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.