Wednesday, October 5, 2022

Buy now

मोदींची मोठी घोषणा : तीन्ही कृषी कायदे रद्द, दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांनी मागे फिरावे

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | शेतकऱ्यांच्या विकासासाठी तीन कृषी कायदे आणले होते. छोट्या शेतकऱ्यांना आणखी ताकद मिळावी, वर्षानुवर्षे ही मागणी होती. देशातील कृषी वैज्ञानिक, शेतकरी संघटना यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही कायदे आणले होते. पण केंद्रीय कृषी कायद्यांचा विषय सुप्रीम कोर्टात गेला. आता आम्ही हे तिन्ही कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 9 वाजता देशाला संबोधित केले. मोदी आज काय बोलणार याकडे सर्व देशाचं लक्ष लागून होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संभाषणात मोठी घोषणा करत वादग्रस्त तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा केली. या घोषणेचे शेतकरी नेत्यांनी स्वागत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना आम्ही समजावण्यात कमी पडोल आहोत. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत असं सांगून शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं.