कोरोनातील अपयश लपवण्यासाठी मोदींकडून ‘बनारस मॉडेल’चा प्रचार ; नवाब मलिकांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांवर परस्पर विरोधी पक्षातील नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. सर्वाधिक टीका हि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. मोदींनी नुकताच देशातील वाराणसीतील डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी येथील प्रशासनाने कोरोनाच्या महामारीत चांगले काम केले. मात्र, मोदींनी या काळातील अपयश लपविण्यासाठी बनारस मॉडेलच चांगले काम करीत असल्याचा प्रचार केला आहे, अशी टीका मलिक यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील विविध डॉक्तरांशी आज संवाद साधला. या संवादावेळी मोदींनी अनेक डॉक्तरांना कोरोनाच्या महामारीत कशा प्रकारे जिद्दीने पुढे उभे राहायचे. केंद्र सरकारकडून दिल्या जाणारी लसीच्या प्रत्येक थेंबाला वाया घालवायचे नाही. एक एक थेंब किती महत्वाचा आहे. याबद्दल मोदींनी डॉक्तरांना मार्गदशन केले. मात्र त्यांच्या या साधलेल्या संवादावरून आता राष्ट्रवादीचे पटवक्ते नवाब मलिक यांनी निशाणा साधला आहे.

मलिक यांनी मोदींवर खोटं बोललं असल्याचा आरोप केला आहे. मलिक यांनी याबाबत ट्विटकरीं माहिती दिली आहे. बनारसच्या घाटावरील प्रेतांवर अंत्यसंस्कार करायला जागा नव्हती. लोकांनी प्रेते गंगा नदी टाकली. या घटनेची देशभर आणि जगभर चर्चा झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘बनारस मॉडेल’ बनवण्यासाठी डीएम, डॉक्टर्स, हॉस्पिटलमधील कर्मचारी व अधिकारी यांच्याशी चर्चा केली. देशात कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी ‘बनारस मॉडेल’ चा प्रचार करण्यात येत आहे. कोरोना काळातील आपले अपयश लपवण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न केला जात आहे, अशी टीका मलिक यांनी केली.

Leave a Comment