Mohammed Shami on Retirement : मोहम्मद शमीची निवृत्तीबाबत मोठी घोषणा; म्हणाला की..

Mohammed Shami on Retirement
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mohammed Shami on Retirement : भारताचा स्टार जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीचे देशभरात करोडो चाहते आहेत. नुकत्याच भारतात पार पडलेल्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेत शमीने दमदार कामगिरी करत संघाला अंतिम फेरीपर्यंत धडक मारून दिली होती. मात्र त्यानंतर शमी दुखापतीमुळे संघाच्या बाहेर आहे. शमीच्या घोट्याला दुखापत झाली असून तो या समस्येने त्रस्त आहे. याच दरम्यान, त्याला त्याच्या निवृत्तीबाबत विचारलं असता त्याने मोठं वक्तव्य केलं आहे.

निवृत्तीबाबत शमी काय म्हणाला- Mohammed Shami on Retirement

एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना मोहम्मद शमी म्हणाला, “मला ज्या दिवशी वाटेल की मी क्रिकेटला कंटाळलो आहे, तेव्हा मी सकाळी उठून माझ्या निवृत्तीबद्दल ट्विट करेन कारण मला कशाचेही ओझे घ्यायचे नाही. माझ्या कुटुंबात मला करिअर किंवा इतर गोष्टींबद्दल समजावून सांगणारे कोणीही नाही असं त्याने म्हंटल. शमी सध्या ३३ वर्षाचा आहे, मात्र सध्या तरी त्याच्या डोक्यात निवृत्तीबाबत (Mohammed Shami on Retirement) कोणताही विचार नसल्याचे त्याने स्पष्ट केलं. मात्र त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी काही वेळ लागेल.

दरम्यान, रोहित शर्मा (Rohit Sharma) हा कोहलीपेक्षा (Virat Kohli) जास्त धोकादायक फलंदाज आहे असेही मत शमीने व्यक्त केलं. त्याच्या मते कोहली खूप प्रेमाने बॉलला मारतो, पण रोहित एकदा का मैदानावर सेट झाला तर तो खूप वाईट पद्धतीने गोलंदाजांचा संमाचार घेतो असं शमी म्हणाला. तसेच भारताचा सर्वोत्तम कर्णधार म्हणून महेंद्रसिंह धोनीला (MS Dhoni) त्याने पसंती दाखवली.

कशी आहे शमीची कारकीर्द –

मोहम्मद शमीने आत्तापर्यंत भारतासाठी 64 कसोटी सामन्यात भाग घेतला असून यामध्ये त्याने 229 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी मध्ये खास करून जेव्हा रिव्हर्स स्विंग मिळतो त्यावेळी शमीच्या गोलंदाजीचा सामना करताना फलंदाजांची भंबेरी उडाल्याचे आपण अनेकदा पाहिले असेल. याशिवाय त्याने 101 एकदिवसीय सामन्यात 195 बळी घेतले आहेत. शमीने भारताकडून 23 टी-20 सामन्यात सुद्धा प्रतिनिधित्व केलं असून यामध्ये त्याने 24 विकेट घेतल्या आहेत.