टीम इंडियातील खेळाडूच्या वडिलांचं निधन, ऑस्ट्रेलियात क्वारंटाइन असल्यानं अंत्यविधीला मुकणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हैद्राबाद । ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस यांचं निधन झालं आहे. ते ५३ वर्षांचे होते. त्यांना फुफ्पुसाशी संबंधित आजार झाला होता. हैदराबाद येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुर्देवाची बाब म्हणजे कोरोना व्हायरसच्या निर्बंधांमुळे भारतीय संघातील खेळाडू सध्या ऑस्ट्रेलियात सिडनीत क्वारंटाइनच्या नियमांचं पालन करत आहेत. यामुळे सिराजला वडिलांच्या अंत्यसंस्कारांसाठी उपस्थित राहता येणार नाहीय.

‘माझा मुलगा देशाचं नाव उज्ज्वल करेल असं माझे बाबा नेहमी बोलायचे आणि मी नक्कीच त्यांची इच्छा पूर्ण करेन’, अशी भावूक प्रतिक्रिया सिराजनं व्यक्त केली आहे. ‘माझ्यासाठी बाबांनी किती खस्ता खाल्यात याची जाणीव मला आहे. प्रसंगी रिक्षा चालवून त्यांनी माझं क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतलीय. बाबांच्या जाण्याचं मला कळलं आणि मला मोठा धक्का बसलाय. माझा खूप मोठा पाठिंबा हरपलाय. भारतासाठी मी खेळावं असं त्याचं स्वप्न होतं आणि माझ्या या दौऱ्यातून त्यांना नक्कीच त्यांना आनंद होईल’, असंही सिराज म्हणाला.

Mohammed Siraj father passes away due to lung ailment pacer to remain with India squad in Australia | मोहम्मद सिराजच्या वडिलांचं निधन, ऑस्ट्रेलियात क्वारंटाइन असल्यानं अंत्यसंस्कारांना मुकणार!

मोहम्मद सिराजने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून चांगली कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या कसोटी मालिकेत सिराजचं पदार्पण होण्याची शक्यता आहे. मोहम्मद सिराजचे वडील रिक्षाचालक होते. परिस्थिती अतिशय बेताची असतानाही केवळ मुलाचं क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी संपूर्ण कमाई सिराजसाठी खर्च केली. आपल्या मुलाला छोट्या गल्लीतील क्रिकेटमधून बाहेर काढून त्याला स्टेडियमपर्यंत पोहोचविण्यात सिराजच्या वडीलांचा खूप मोठा वाटा आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment