रतन टाटांच्या मृत्युपत्रात धक्कादायक खुलासा; ‘या’ व्यक्तीसाठी ठेवले 500 कोटी रुपये

0
3
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 86 व्या वर्षी (9 ऑक्टोबर 2024 ) टाटा उद्योग समूहाचे प्रमुख रतन टाटा (Ratan Tata) यांचे निधन झाले. त्यांनी निधनाच्यापूर्वी आपल्या संपत्तीचे वाटप योग्यरित्या होण्यासाठी इच्छापत्र (मृत्युपत्र) तयार केले होते. आणि आता त्याच इच्छापत्राबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. त्यांनी आपल्या संपत्तीचा एक तृतीयांश भाग मोहिनी मोहन दत्ता यांना दान केली आहे. म्हणजेच आता मोहिनी मोहन दत्ता यांना संपत्तीतून तब्बल 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम भेटणार असल्याची चर्चा सगळीकडे रंगत आहे. पण हि व्यक्ती नक्की कोण आहे याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तर चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

मोहिनी मोहन दत्ता –

मोहिनी मोहन दत्ता आणि टाटांशी त्यांची भेट 24 वर्षांच्या वयात झाली होती, जेव्हा ते दोघे जमशेदपूरमध्ये भेटले होते. दत्तांनी रतन टाटांकडून मोठा आधार घेतला आणि त्यांना करियरमध्ये पुढे जाण्याचा संधी मिळाला. त्यांनी ताज हॉटेलमधून आपल्या करियरची सुरुवात केली आणि नंतर टाटा इंडस्ट्रीजने त्यांच्या स्टॅलियन ट्रॅव्हल एजन्सीमध्ये गुंतवणूक केली. ही एजन्सी नंतर ताजच्या ट्रॅव्हल डिव्हिजनमध्ये विलीन झाली. सध्या दत्ता थॉमस कुक इंडिया चे संचालक आहेत आणि त्यांना टाटा समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स देखील मिळाले आहेत. दत्ता यांची आणि रतन टाटा यांची 60 वर्षांहून अधिक काळाची ओळख आहे असेही म्हंटले जात आहे..

बहुतेक संपत्ती धर्मादाय कामांसाठी दान –

रतन टाटा यांनी आपल्या बहुतेक संपत्ती धर्मादाय कामांसाठी दान केली आहे, पण त्यात काही रक्कम टाटा कुटुंबातील सदस्यांना देखील दिली आहे. यामध्ये टाटा सन्समधील शेअर्स, लक्झरी कार्स, महागड्या पेंटिंग्ज आणि स्टार्टअप्समधील शेअर्स यांचा समावेश आहे. या खुलाशामुळे टाटा समूहात सध्या चर्चांचा धुरळा उडाला आहे. रतन टाटा यांच्या इच्छापत्रातील मोहिनी मोहन दत्ताच्या दानामुळे अनेक गोष्टी स्पष्ट होणार आहेत.