न्यायालयाच्या निर्देशाची महाविकास आघाडी सरकार अंलबजावणी का करत नाही?; मोहित कंबोज यांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढा अन्यथा दुप्पट आवाजात मशिदीसमोर लाऊड स्पीकरवर हनुमान चालीसा वाजवणार असा इशारा राज्यसरकारला दिला आहे. त्यांच्या वक्तव्यारून सध्या राजकीय वातावरण चांगळेच तापले आहे. आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी आज एक ट्विट करत महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. “2005 मध्ये न्यायालयाने निर्देश दिले होते मश्जिदी वरील भोंगे काढायाचे. मग न्यायालयाच्या निर्देशाची महाविकास सरकार अंलबजावणी का करत नाही?;   तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री वळसे पाटील यांच्याकडून का कारवाई होत नाही? असा प्रश्न कंबोज यांनी केला आहे.

मोहित कंबोज यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला असून त्याममधून त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी कंबोज म्हणाले की, “2005 मध्ये न्यायालयाने निर्देश दिले होते मश्जिदी वरील भोंगे काढायाचे. मग अजून अंमलबजावणी का होत नाही?. सर्वोच्च न्यायालयाकडूनही बेकायदेशीर रीतीने मश्जिदी वरील भोंगे वाजविले जात असून याबाबत निर्णय दिले आहेत.

अशात गृहमंत्री म्हणतात कि हनुमान चाळीस लावत धार्मिक तेढ निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. त्यांना एवढं सांगतो कि आम्ही कोणतेही असे काम करत नाही. वास्तविक आम्ही सुप्रीम कोर्टाकडून ध्वनी प्रदूषणाबाबत दिलेल्या आदेशाबाबत आम्ही बोल्ट आहोत. मात्र, तुम्हीच धार्मिकतेच मुद्दा काढत आहेत.