महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार!! मोहित कंबोज यांचा खळबळजनक दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) टप्पे पार पडत आहेत. आता या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होणार आहे. त्यानंतर पुढे 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. परंतु हा निकाल लागण्यापूर्वीच भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. नुकतेच कंबोज यांनी एक ट्विट करत राजकीय वर्तुळात आणखीन एक भूकंप होणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

मोहित कंबोज यांनी आपल्या X वर केलेल्या ट्विटमध्ये म्हणले आहे की, “लोकसभा निवडणुकीचा 04 जून रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आणखी एक फूट पडेल. या दोन्ही पक्षातील आमदार, नेते आणि कार्यकर्ते राजीनामा देऊन बाहेर पडतील. सध्या हे सर्वजण इतर पक्षांच्या संपर्कात आहेत.” मोहित कंबोज यांनी केलेल्या याचं दाव्यामुळे राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच, खरंच ठाकरे गट आणि शरद पवार गटात ही फूट पडेल का? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

दरम्यान, 4 जूननंतर भाजप पक्षातही फूट पडेल असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. नाशिकमध्ये झालेल्या सभेत बोलताना, “माझी मला चिंता नाही. मला तुमच्या आशीवार्दाचं कवच आहे, तोपर्यंत मला कोणाचीही भीती नाही. मोदीजी तुम्ही तुमच्या भाजपची चिंता करा. कारण 5 तारखेलाचा अर्धा भाजप पक्ष फुटल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्ही सगळे गद्दार जमवले आहेत, सत्ता आल्यावर सगळी यंत्रणा आमच्या हातात असेल” असे उद्धव ठाकरे यांनी म्हणले आहे.