Madha Lok Sabha 2024 : मोहिते-पाटील घराण्याचा माढा, सोलापुरातील वचक संपल्यात जमा?

Mohite-Patil thumbnail 1
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखेर तो दिवस आलाय.. सोलापुरच्या धैर्यशील मोहिते पाटलांनी, शरद पवारांची भेट घेतली, आणि माढ्यातून , ते तुतारी फुंकणार हे फिक्स झालंय.. येत्या १४ तारखेला, ते भाजपला सोडचिठ्ठी देऊन , राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करतील, अशी माध्यमांमध्ये चर्चा आहे.. मोहिते पाटील घराणं, हे पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण फिरवतात…मोहिते पाटलांचा आशिर्वाद असल्याशिवाय, या पट्ट्यात आमदार, खासदार होता येत नाही…अशा अनेक गोष्टी, आपण कधी ना कधीतरी ऐकल्या असतील…त्यामुळे मो्हिते पाटील घराणं, लोकसभेच्या निम्मिताने पुन्हा राष्ट्रवादीत येणार, म्हणजे भाजपसाठी , आजूबाजूच्या मतदारसंघातलं गणित ,आणखी किचकट होऊ शकतं, हे ही खरं आहे.. पण मोहिते पाटील घराण्याला, सध्या माध्यमांमध्ये, ज्या पद्धतीनं पोट्रेट केलं जातंय, तसा वचक, आता खरंच राहिला आहे का?, अकलूजच्या मोहिते पाटलांचा इतिहास, जरी राजकीय पराक्रमाचा असला, तरी वर्तमानात , यात कितपत तथ्य आहे? ते जाणून घेऊयात…

अकलूजच्या मोहिते-पाटील घराण्याला, एक भलामोठा राजकीय वारसा लाभलाय.. शंकरराव पाटील, यांनी उभारलेला सहकाराचा वारसा, त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी कायम ठेवला.. विजयसिंह मोहिते पाटलांनी , आमदार, मंत्री आणि पुढे , उपमुख्यमंत्री पदापर्यंत, मजल मारत, आपल्या घराण्याचा, राजकारणात वचक ठेवला.. याचाच परिणाम म्हणजे, संपूर्ण सोलापूरात , ‘सब कुछ मोहिते – पाटील’ , असं एक वातावरण तयार झालं.. विजयसिंग मोहिते पाटील, १९८० ते १९९५ पर्यंत, प्रत्येक सरकारच्या मंत्रीमंडळात फिक्स होते.. १९९९ ला मोहिते पाटलांनी , राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर, पवारांना साथ दिल्यानं, २००९ पर्यंतचा काळ, त्यांच्यासाठी सुवर्णकाळ ठरला.. रणजितसिंह मोहिते पाटील, सुप्रिया सुळेंच्या जागेववर राज्यसभेवर गेले.. मात्र २००९ ला, माळशीरस तालुका ऱाखीव झाल्यावर, पंढरपूर मतदारसंघातून झालेला, त्यांचा पराभव , हा अनेक अर्थानं महत्वाचा राहिला.. २०१४ ला, त्यांनी लोकसभेतून, पुन्हा दमदार एँन्ट्री घेतली, पण २०१९ ला , मुलाच्या उमेदवारीसाठी , अडून बसलेल्या मोहितेंना , अखेर भाजपात जावं लागलं. आता पुन्हा एकदा मोहिते पाटलांची, भलीमोठी ताकद असतानाही, भाजपनं त्यांना डावलून , स्टँडिंग खासदार रणजितसिंह निंबाळकरांनाच संधी दिली.. मोहिते पाटलांना डावलण्याची , भाजपनं धमक दाखवली.. उमेदवाराची कमतरता असताना, मोहिते पाटलांचा पर्याय समोर असूनदेखील, पवारांनी त्यांना पुन्हा आपल्या सोबत घ्यायला वेळ लावलाय.. या सगळ्यातून , मोहितेे पाटलांचं वजन, सध्याच्या राजकारणाला, रिलेवेंट नसल्याचंंच यातून दिसून येतं..

मोहिते पाटलांच्या राजकारणाला, आम्ही फुसका बार म्हणतोय, त्याला पहिला आधार आहे, तो विजयदादांंच्या नेटवर्कला, पुढची पिढी मॅच करु शकली नाही , याचा…२००९ पर्यंत, विजयदादांचा, महाराष्ट्राच्या राजकराणात वावर होता, तोपर्यंत त्यांच्या नेटवर्कला तोड नव्हती.. ग्रामपंचायत, जिल्हा परिषदा, सहकार, दुग्धसंस्था, शिक्षण संंस्था, आमदार, खासदार, या सगळ्यांंसाठी विजयदादांचा शब्द, अंतिम मानला जायचा.. सोलापूरसोबत, आसपासच्या मतदारसंघाच्या उमेदवारांची, तिकीट ठरवण्यापासून, ते त्यांना निवडून आणण्यापर्यंत, सगळा खेळ , अकलूजमधून चालायचा.. जिल्ह्यातील बहुतांश आमदारांच्या डोक्यावर, मोहिते पाटलांचाच हात असायचा.. किंवा मोहिते पाटलांनी ठरवल्याशिवाय, इथला उमेदवार आमदार व्हायचा नाही, इतकी त्यांची राजकारणावर, मजबूत पकड होती.. मात्र सध्याची परिस्थिती पाहिली, तर ती चित्रं पुरतं बदललंय, असं म्हणावं लागेल.. विजयदादांच्या पुढच्या पीढीला, या नेटवर्कवर कंट्रोल ठेवता आला नाही.. म्हणूनच आज, ज्या माढालोकसभेतून मोहिते – पाटील येतात, त्याच माढ्यातील आमदार, आज त्यांच्या विरोधात आहेत.. संजयमामा शिंदे, बबन शिंदे, जयकुमार गोरे, शहाजीबापू पाटील , आणि राम सातपुतेे , या सगळ्या स्टँडिंग आमदारांनी, उमेदवारी मोहिते – पाटलांना न देता, रणजितसिह निंबाळकरांनाच दिली जावी, असा स्टँड घेतला.. इतकंच काय, तर मतदारसंघातल्या, अनेक लहान मोठ्या राजकीय गटांनी, निंबाळकरांच्याच मागे , आपली ताकद असल्याचं क्लिअर केलंय.. त्यामुळे स्वत:च्या मतदारसंघातच, प्रभाव पाडू न शकणाऱ्या मोहिते – पाटलांचा, सोलापूर आणि साताऱ्यातील कनेक्ट, किती तोकडा असेल, याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो..

मोहिते पाटलांचा प्रभाव , संपुष्टात यायला कारणीभूत ठरलेली, दुसरी गोष्ट म्हणजे, दबावाचं राजकारण… मोहिते पाटलांचा, सध्याच्या पीढीच्या, लोकांमधील कनेक्ट कमी झालाय.. प्रत्येक गावातील , आपल्या हक्काच्या कार्यकर्त्यांना बळ देऊन, त्यांच्या जोरावर, मोहिते – पाटलांचं राजकारण अवलंबून असल्याचं, स्थानिक लोक सांगतात.. करमाळ्यात मोहिते पाटलांच्या, विरोधात बोलण्याची कुणाची टाप नाही.. स्थानिक पत्रकारांशी, जेव्हा आम्ही या अनुषंगाने बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी सांगितलं, की तालुक्यातील अनेक गावच्या सरपंचांना, खरंतर भाजपला मतदान करायचं नाहीये.. मात्र मोहिते -पाटील त्यांच्यासोबत आहेत, म्हणून आम्हाला बळजबरी, हे मतदान करावं लागतंय .. ‘.जिकडंं मोहिते – पाटील, तिकडं आम्ही’ , येवढं प्रेम करणाऱ्या , एकगठ्ठा लोकांंचं मतंही, मोहिते – पाटलांच्या पाठीशी आहेच.. मात्र केवळ मोहिते – पाटलांच्या धाकापोटी, मतदान करणारा एक मोठा टक्का, या भाागात असल्याने , दबावाच्या राजकारणाचा फायदा होण्यापेक्षा, तोटाच , मोहिते – पाटलांना होताना दिसतोय.. पाटलांच्या प्रभावात राहून, काम करावं लागेल, आपलं स्वत:च स्वतंत्र, असं अस्तित्व राहणार नाही.. हाच विचार पुढे घेऊन, इथले अनेक स्थानिक आमदार, राजकीय नेते, मोहिते – पाटलांच्या विरोधात गेलेत..

त्यामुळे मोहिते – पाटील नावाची, जी काही हाईप , सध्या मीडियामधून दिली जातेय.. त्यापेक्षा वास्तव, काहीसं वेगळं असल्याचं यातून समोर येतं..पण जेव्हा लोकसभेच्या लढतीकडे, रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील, या अंगानं आपण पाहतो, तेव्हा काही गोष्टी या नकळत मोहिते पाटलांच्या पथ्यावर पडतात..

माढ्यात, शरद पवारांना मानणारा , एक खूप मोठा गट आहे.. स्वत: शरद पवार , या मतदारसंघातून निवडणूक लढवून जिंकले देखील आहेत.. त्यामुळे पवार आणि मोहिते – पाटील, ही ताकद जेव्हा एक होते.. तेव्हा राष्ट्रवादीला मानणारा मतदार, प्लस मोहिते – पाटलांच्या पाठिशी, कोणत्याही परिस्थितीत उभं राहणार एकगठ्ठा मतदान, अशी बेरीज करुन पाहिली, तर निवडणूक जिंकण्यासाठी, जे मधलं मार्जिन भरुन काढणं, गरजेच असते.. ती यातून हमखास भरुन निघू शकते.. धैर्यशील मोहिते पाटलांना, महाराष्ट्रातल्या, किंवा दिल्लीतल्या राजकारणाचा अनुभव नसला, तरी मोहिते-पाटील घराण्यातील , एक आक्रमक राजकीय नेतृत्वाचा पर्याय, त्यांच्या रुपाने समोर आलाय.. एकट्या मोहिते – पाटील कुटूंबातील, ८ ते ९ जण सक्रीय राजकारणात असल्याने, जेव्हा प्रत्यक्ष प्रचाराची वेळ येईल, तेव्हा निंबाळकरांच्या तुलनेत, चौखुर प्रचार करणं, सहजसोपं असणार आहे.. मतदारसंघाचा ,आणि बाहेरचा असा वाद असणार आहेेच , पण त्यासोबतच, मराठा आरक्षण, शेतकरी धोरण, सरकारच्या विरोधात असणारी नाराजी , हे सगळे फॅक्टर निंबाळकरांपेक्षा, मोहिते – पाटलांना प्लसमध्ये घेऊन जातात..

एकेकाळी भल्याभल्या पुढाऱ्यांना, स्वत:च्या तालावर नाचवणाऱ्या मोहिते – पाटलांना, स्वत:च्या उमेदवारीसाठीच धडपड करावी लागत असली, तरी, माढ्यातील विजयानं, जिल्ह्यातील राजकारणावर असणाऱ्या, त्यांच्या कंट्रोलवर शिक्कामोर्तब होणार आहे.. एवढं मात्र नक्की.. त्यामुळे माढ्याची खासदारकी, यंदा मोहिते – पाटील घराण्याकडे जाऊ शकते का?, मोहिते – पाटलांच्या राजकीय ताकदीबद्धल, तुमचा काही वेगळा अँगल आहे का?, असेल तर तो आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा