औरंगाबाद | शहरातील कलेक्टर ऑफिस जवळ आज भररस्त्यात मोकाट जनावरे बसलेले आढळून आले. यामुळे नागरिकांना वाहन चालकांना अडचण निर्माण होत असून अनेक अपघातही होत आहेत.
शहरात वाहनांची वर्दळ असलेल्या कलेक्टर ऑफिस जवळील चौकात गाईंचा घोळका भररस्त्यात बसलेला होता. यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना रस्ता काढूनच जावे लागत होते. या मोकाट जनावरांमूळे कलेक्टर ऑफिस कडून टीव्ही सेंटरकडे वेगाने जाणाऱ्या वाहनधारकांना लक्षपूर्वक रस्ता काढावा लागत होता अनावधानाने या ठिकाणी अपघातही झाला असता
शहरात मोठ्या प्रमाणावर मोकाट जनावरांसह कुत्रे, मांजर, म्हशी आणि डुकरे यांचाही सुळसुळाट पहायला मिळत आहे. यामुळे अनेक अपघातही होत आहेत. दोन दिवसापूर्वी एका दुचाकीस्वार महिलेचा कुत्र्याने पाठलाग केल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. मोकाट जनावरांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.