कराडात मोकाट कुत्र्यांनी 3 वर्षांचा चिमुकल्याचा घेतला जीव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराडच्या वाखाण भागातून काही अंतरावर असलेल्या ग्रामीण भागात एका चिमुकल्याचा जीव मोकाट कुत्र्यांनी घेतला. राजवीर ओव्हाळ (वय 3) असे या मूलाचे नाव आहे. या घटनेमुळे पालकांच्यात घबराटीचे वातावरण असून राजवीरचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आज दुपारी मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राजवीर ओव्हाळ (वय 3) असे या मूलाचे नाव आहे. संबंधित जखमी मुलास वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

ओव्हाळ कुटुंबीय मोलमजुरी करण्यासाठी वाखाण परिसरात गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्य करीत आहेत. आई-वडील कामावर गेल्यानंतर राजवीर हा त्यांचा मुलगा इतर मुलांच्या व त्याच्या बहिणी सोबत खेळत असताना आमराईबन परिसरात मोकाट कुत्र्यांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांनी तातडीने त्यास कॉटेज हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल केले. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्री त्रास देत असल्याचे या ठिकाणच्या नागरिकांनी सांगितले.

Leave a Comment