- औरंगाबाद : आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने पुकारण्यात आलेला आक्रोश मोर्चाला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्याने मोर्चा रद्द करून, त्याऐवजी जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन 26 जून रोजी सकाळी 11 वाजेला देण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.
आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने पदोन्नतीतील आरक्षण रद्द लरण्याच्या शासनाने घेतलेल्या निर्णयाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. याच मागणी साठी राज्यभर जिल्ह्याच्या ठिकाणी मोर्च्याचे आयोजन केले होते. त्यानुसार औरंगाबाद येथील 26 जून रोजी जुबली पार्क येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाची सुरुवात करण्यात येणार होती.
मात्र पोलिस प्रशासनाच्या वतीने या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आल्याने मोर्चा न काढता आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे. तरी सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये सकाळी जमावे असे आवाहन आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजीनियरिंग चे अध्यक्ष अभियंते अशोक ससाने यांनी केले आहे.