आता ATM मशीनला कुठेही हात न लावता काढता येणार पैसे; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता एटीएम कार्डधारक एटीएम मशिन्सच्या स्क्रीनला आणि बटणांना स्पर्श न करताही पैसे काढू शकतील. एम्पेज पेमेंट सिस्टम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने मास्टरकार्ड बरोबरच्या कराराखाली एक कार्डलेस एटीएम आणला आहे. यामुळे एटीएम मशिन्सला स्पर्श करण्याची आवश्यकता कमी होईल आणि ते सुरक्षितही असेल.

आता काही सेकंदातच पैसे निघतील – युझर्स सुरक्षित मार्गाने या ४ सोप्या स्टेप्सला फॉलो करून कॅश काढू शकतील.

पहिले आपले बँकिंग अ‍ॅप उघडा. यानंतर एटीएममधील क्यूआर कोड स्कॅन करा. त्यानंतर बँकिंग अ‍ॅपमध्ये किती पैसे काढायचे आहेत ती रक्कम अधिकृत करा आणि एटीएममधून कॅश घ्या. यात एटीएममध्ये कोणतेही फिजिकल डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरण्याची गरज नाही, ज्यामुळे अनावश्यक होणारा संपर्क कमी होईल. सध्याच्या कोरोनाच्या या संकटात रोख रक्कम काढण्यासाठीचा हा एक चांगला पर्याय आहे.

हे कार्डलेस ‘एटीएम पावर्ड बाय मास्टरकार्ड’ एटीएम युझर्स ना जवळच्या इनेबल्ड एटीएमचे लोकेशन डिजिटलपणे शोधण्यात मदत करेल. पैशांच्या व्हिड्रॉलसाठी आपल्याला मोबाइल फोनवर त्यांचे बँकिंग अ‍ॅप वापरुन क्यूआर कोड स्कॅन करणे आवश्यक असेल.

कंपनीने एक निवेदन जारी केले आहे की, Empays IMT पेमेंट सिस्टमशी करार केला आहे, ज्या अंतर्गत ते मास्टरकार्ड कार्डलेस एटीएम आणि ईएमव्ही रोख पैसे काढण्याच्या व्यवहाराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी IMT पेमेंट सिस्टममागील बेसिक टेक्नोलॉजीला अपग्रेड करेल. .

IMT पेमेंट सिस्टम ही जगातील कार्डलेस कॅशलेस काढण्यासाठीची सर्वात मोठे एटीएम नेटवर्क आहे आणि देशभरातील ४०,००० एटीएममध्ये उपलब्ध आहे.

यामध्ये एटीएमशी कोणताही शारीरिक संपर्क न करता एटीएममधून पैसे काढणे सुलभ होते आणि यासाठी एसएमएस टेक्नोलॉजीचा वापर करते. Empays ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने राष्ट्रीय पेमेंट सिस्टम म्हणून अधिकृत केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment