ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक आणि खेळाडूंमध्ये पैशांवरून वाद ! रिपोर्टमध्ये खळबळजनक दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) सध्या दुहेरी संकटातून जात आहे. एकीकडे संघाची कामगिरी सतत खालावत चालली आहे. तर दुसरीकडे, प्रशिक्षक आणि खेळाडूंमध्ये वाद झाल्याची बातमी समोर आली आहे. मात्र प्रकरणाने एक मनोरंजक वळण घेतले आहे. प्रशिक्षक जस्टीन लँगरवर बनवल्या जाणाऱ्या डॉक्यूमेंट्रीसाठी खेळाडूंना जास्त पैसे मिळत आहेत. यामुळे प्रशिक्षक आणि खेळाडूंमध्ये दरी निर्माण झाली आहे.

सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या बातमीनुसार जस्टिन लँगरला अ‍ॅमेझॉन प्राइमकडून डॉक्यूमेंट्रीसाठी सुमारे 30 लाख रुपये मिळाले. त्याने खेळाडूंना त्यांच्या पातळीवर अ‍ॅमेझॉनशी बोलण्यास सांगितले. जरी खेळाडू अगदी काही वेळच स्क्रीनवर दाखवले गेले असले तरीही अ‍ॅमेझॉनकडून खेळाडूंना लँगरपेक्षा दुप्पट 60 लाख रुपये मिळाले.

2018 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान जस्टिन लँगर आणि उस्मान ख्वाजा यांच्यातील संघर्षाचे चित्रण या डॉक्यूमेंट्रीमध्ये करण्यात आले आहे. या डॉक्यूमेंट्रीच्या एकूण 8 सिरीज आहेत. प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्यातील भांडणाची ही पहिलीच घटना होती. परंतु या वर्षाच्या सुरुवातीला अशी बातमी आली की वरिष्ठ खेळाडू लँगरच्या आक्रमक वर्तनामुळे नाराज होते.

या खुलाशानंतर, क्रिकेट ऑस्ट्रेलियाला संघाच्या वरिष्ठ खेळाडूंसोबत तातडीची बैठक बोलावणे भाग पडले, जेणेकरून हा वाद संपुष्टात येईल. प्रशिक्षक, कसोटी कर्णधार टीम पेन, टी -20 आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार आरोन फिंच, वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स या बैठकीला उपस्थित होते.

नुकत्याच झालेल्या टी -20 मालिकेत ऑस्ट्रेलियाला वेस्ट इंडिज आणि बांगलादेशविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. एवढेच नाही तर टीम इंडियाविरुद्ध घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत 1-2 ने पराभव पत्करावा लागला होता. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी -20 विश्वचषकाचे सामने होणार आहेत. अशा परिस्थितीत क्रिकेट ऑस्ट्रेलियाला एवढ्या मोठ्या स्पर्धेपूर्वी वाद मिटवायचा आहे.