ऊसतोडीसाठी पैसे घेतल्यास बिलातून वसुली करण्याचा कृष्णा कारखान्याचा निर्णय; तोडणी यंत्रणेला इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड, ता. ४ : उसतोडीसाठी पैसे घेतल्यास ते पैसे संबंधित तोडणी यंत्रणेच्या बिलातून वसूल करण्याचा निर्णय कृष्णा कारखाना व्यवस्थापनाने घेतला आहे. कारखान्याच्या या निर्णयाचे शेतकऱ्यांमधून स्वागत केले जात आहे.

यावर्षी कोरोना संकटामुळे तोडणी यंत्रणेची कमतरता व जादा ऊस क्षेत्र यामुळे ऊस लवकरात लवकर कारखान्याकडे पाठविण्यासाठी धावपळ सुरू आहे. त्यातच कोरोनाच्या सावटामुळे उस तोडीअभावी शेतात राहू नये याची काळजी शेतकऱ्यांना आहे. नेमका याचाच फायदा उठवीत तोडणी कंत्राटदार, मुकादम व मजुरांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक सुरू आहे.

त्यामुळे तोडीसाठी पैसे घेतल्याची शेतकऱ्यांची तक्रार आल्यास त्यांची योग्य चौकशी करून, ते पैसे संबंधित कंत्राटदार, मुकादम किंवा मजुरांच्या बिलातून वसूल करून शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. तसा निर्णय कृष्णा सहकारी साखर कारखाण्याच्या व्यवस्थापनाने घेतला आहे. कारखान्याच्या या निर्णयाचे शेतकऱ्यांतून स्वागत होत असून, तक्रारीसाठी शेतकऱ्यांनी कारखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांनी केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment