नबाव मलिकांना मोठा धक्का : डी-गँगशी संबंध असल्याचे कोर्टाचे निरीक्षण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मनी लॉन्ड्रीग प्रकरणी सध्या अटकेत असलेल्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याअडचणीत आता वाढच होताना दिसून येत आहे. कारण मलिक यांच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राची मुंबई सत्र न्यायालयाने दखल घेतली आहे. प्रथमदर्शनी मलिक हे प्रत्यक्षात सर्व माहिती असतानाही गोवावाला कंपाउंड संदर्भातील आर्थिक गैरव्यवहारामध्ये (मनी लॉण्ड्रींग) सहभागी होते असे दिसत असल्याचे पुराव्यांवरुन स्पष्ट होत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

न्यायालयाने नुकतेच आपले निरीक्षण नोंदवले असून त्यामध्ये विशेष न्यायाधीश राहूल एन रोकडे यांनी म्हंटले आहे की,” नवाब मालिकांनी डी कंपनीचे सदस्य असणाऱ्या हसिना पारकर, सलिम पटेल आणि सरदार खान यांच्यासोबत गुन्हेगारी कट रचून मुनीरा प्लंबर यांच्या नावे असणारी संपत्ती बळकावली आहे. मलिक यांनी दाऊदची दिवंगत बहीण हसीना पारकरच्या आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने जमीन बळकावल्याने त्यांच्याविरोधात मनी लाँण्ड्रींगविरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करता येईल.

ईडीने आरोपपत्रात काय माहिती दिली?

ईडीच्यावतीने न्यायालयात सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रात असे म्हंटले आहे की, मलिक यांनी एका सर्वेक्षकाच्या माध्यमातून गोवावाला कंपाऊंडमध्ये बेकायदेशीर भाडेकरूंचा सर्व्हे केला होता आणि सर्व्हेअरशी समन्वय साधण्यासाठी त्यांनी सरदार शाहवली खानची मदत घेतली होती. एवढेच नाही तर मलिक यांनी हसिना पारकर, सरदार खान यांच्यासोबत ही जमीन हडपण्याच्या दृष्टीने अनेक बैठकी घेतल्याचा दावाही ईडीने त्यांच्या चार्टशीटमध्ये केला आहे.

Leave a Comment