औरंगाबाद | पडेगाव येथे 31 जुलै रोजी सकाळी नऊच्या सुमारास एका प्राध्यापिकेचेच्या पर्स चिचेन उघडून दोन हजारांची रोकड लांबवली होती. ही घटना 31 जुलै रोजी घडली होती. याबाबत प्राध्यापिकेने दोन महिलेवर संशय व्यक्त केला होता.
यावरून कर्नाटक राज्यातील दोन महिलांना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्या दोन महिलांना एक दिवसाची कोठडी सुनावली आहे. दीपा आणि सुनीता अशी त्यांची नावे आहेत. पैठण येथील जीवी जोसेफ चिट्टायत, वय – 52 (रा.शशी विहार) या धुळ्याच्या शिरपूर येथील महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. सकाळी नऊच्या सुमारास त्या औरंगाबाद धुळे बसने शिरपूरकडे जात होत्या.
त्यावेळी सहप्रवासी म्हणून त्यांच्या पाठीमागे बसलेल्या दोन महिलांसह त्यांच्या काही साथीदारांनी यांच्या पाठीमागील जिवी यांच्या पर्सची चैन उघडून त्यातील दोन हजार रुपये चोरले. हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी व्यक्त केलेल्या संशयावरून आणि सुनीता यांना पकडण्यात आले.