Monkey Pox | सध्या जगभरात मंकीपॉक्स (v) या आजाराने थैमान घातलेले आहे. या आजाराच्या रुग्णांची संख्यांमध्ये दिवसेंदिवस जगभरात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच आता संशयित मंकीपॉक्स रुग्णाची भारतात देखील नोंद झालेली आहे. आरोग्य मंत्रालयाने या संदर्भात माहिती दिलेली आहे. तसेच या रुग्णाला वेगळे ठेवण्यात देखील सांगण्यात आलेले आहे. सध्या आफ्रिकन देशात मंकीपॉक्सच्या (Monkey Pox) आजाराची संख्या वाढत आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेकडूनही या देशांमध्ये आणीबाणी घोषित केली आहे. गेल्या तीन वर्षात दुसऱ्यांदा ही वेळ आलेली आहे. त्याचप्रमाणे जागतिक स्तरावर देखील या आजाराबाबत जागरूकता पसरवत आहेत आणि काळजी देखील घेतली जात आहे.
याबाबत माहिती देताना आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे की, संशयित रुग्णाला रुग्णालयात दाखल केलेले आहे. आणि विलगीकरणात देखील ठेवण्यात आलेले आहे. सध्या या रुग्णांची स्थिती स्थिर आहे. मंकीपॉक्सच्या आजाराची स्थिती जाणून घेण्यासाठी त्याच्या रक्ताची चाचणी देखील केली जात आहे. हा रुग्ण परदेशातून आलेला असल्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे. म्हणूनच त्याची तपासणी चालू आहे असे सांगण्यात आलेले आहे.
मंकी पॉक्स आजार म्हणजे काय ?
मंकी पॉक्स हा आजार सध्या मध्य आणि पश्चिम आफ्रिकामध्ये आढळणारा एक साथीचा आजार आहे. हा आजार देवीच्या आजारासारखा असतो. पण कमी संसर्गजन्य आहे. जर त्या एखाडी व्यक्ती एमपॉक्स झालेल्या व्यक्तीचा प्राण्यांच्या संपर्कात आला किंवा या विषाणूने दूषित असलेले मांस खाल्ले तर हा रोग खूप झपाट्याने पसरत आहे. गर्भवती महिलांवर देखील याचा खूप जास्त परिणाम होताना दिसत आहे.
जगभरात आढळली 99176 मंकीपॉक्सची प्रकरणे
जागतिक स्तरावर सध्या या रोगाने थैमान घातलेले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार एक जानेवारी 2022 ते 30 जून 2024 या कालावधीत जगभरात मंकीपॉक्स जवळपास 99176 प्रकरणे नोंदवली गेलेली आहेत. या थायलंडमध्ये 5 प्रकरणे आणि दहा जणांचा मंकी मंकी पॉक्समुळे मृत्यू झालेला आहे. इंडोनेशियामध्ये 88 प्रकरणे, भारतात 87 प्रकरणे आणि एक मृत्यू, श्रीलंकामध्ये चार प्रकरणे आणि नेपाळमध्ये एक मृत्यू झालेला आहे.
मंकीपॉक्स आजाराची लक्षणे
मंकी (Monkey Pox )झाल्यावर रुग्णाला सातत्याने ताप येतो. डोकेदुखी होते, स्नायू दुखतात तसेच सूज येते यातील महत्त्वाचे लक्षण म्हणजे अंगावर पुरळ उठतात. आणि हे पुरळ चेहऱ्यावर उठण्यापासून सुरुवात होते. तसेच संपूर्ण अंगावर हे पसरतात. ही लक्षणे दोन ते चार आठवडे राहतात. हा आजार एक संसर्गजन्य आजार असून पूर्वी देवी आजारासारखा आहे. सध्या आफ्रिकन देशा व्यतिरिक्त इतर कोणत्याही देशांमध्ये हे रुग्ण नाही. तरीही काही लोक आंतरराष्ट्रीय प्रवास करतात. त्यांच्याकडून हा आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा आजार प्रामुख्याने खोकल्यातून पसरू शकतो. त्यामुळे लोकांनी काळजी घेतली पाहिजे, असे देखील सांगण्यात आलेले आहे.
मंकी पॉक्सची लक्षणे दिसल्यास काय करावे
- वरील लक्षणे दिसल्यास त्या व्यक्तीला विलगीकरणात ठेवावे.
- बाधित झालेल्या व्यक्तीला मास्क वापरणे बंधनकारक आहे.
- सदर रुग्णाची माहिती ही आरोग्य केंद्रात द्यावी.
- बाधित झालेल्या रुग्णांनी ज्या गोष्टींचा वस्तूंचा वापर केलेला आहे त्या वस्तू वापरू नये.
- तसेच इतर नागरिकांनी साबण आणि पाण्याचा वापर करून हात स्वच्छ करावेत.