Monsoon 2025 In Kerala : मान्सून केरळमध्ये दाखल, यंदा 8 दिवस आधीच एंट्री; महाराष्ट्रात कधी?

Monsoon 2025 In Kerala
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Monsoon 2025 In Kerala । एकीकडे महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस तडाखा देत असताना दुसरीकडे केरळमध्ये मान्सूनचे आगमन झालं आहे. अंदाजापेक्षा ८ दिवस आधीच मान्सूनने केरळला धडक दिली आहे. महत्वाचं म्हणजे मागील १६ वर्षात प्रथमच इतक्या लवकर मान्सूनचे केरळ मध्ये आगमन झालं आहे. यापूर्वी २००९ मध्ये मान्सून २३ मे ला केरळ मध्ये दाखल झाला होता. त्यानंतर तो साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळ मध्ये दाखल होत होता. मात्र यंदा सर्वानाच आश्चर्याचा धक्का देत आज २४ मे २०२५ रोजी मान्सूनने केरळमध्ये एंट्री मारली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज केरळमध्ये नैऋत्य मान्सूनने आगमन (Monsoon 2025 In Kerala) केले. केरळनंतर पुढील काही दिवसांमध्ये मान्सूनचा प्रवेश दक्षिण आणि मध्य भारतात होणार आहे. मात्र हवामान तज्ञ् असेही सावध करतात की मान्सून लवकर सुरू होणे नेहमीच स्थिर पाऊस पडेल याची खात्री असू शकत नाही. हे कधीकधी देशातील उर्वरित भागात मान्सूनच्या प्रगतीत विलंब आणि अनियमित पावसाच्या पद्धतींचे संकेत देऊ शकते. दरम्यान दक्षिण कोकण आणि गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून या भागांत प्रचंड पाऊस सुरु आहे.

मुंबईत मान्सूनची एंट्री कधी? Monsoon 2025 In Kerala

केरळ हे मान्सूनचे भारतातील प्रवेशद्वार मानले जाते. केरळात प्रवेश केल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून देशभरात आगेकूच करतो. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, यापूर्वी मान्सून गेल्या वर्षी ३० मे रोजी केरळमध्ये दाखल झाला. त्याच्याआधी २०२३ मध्ये ८ जून; २०२२ मध्ये २९ मे; २०२१ मध्ये ३ जून; २०२० मध्ये १ जून; २०१९ मध्ये ८ जून; आणि २०१८ मध्ये २९ मे रोजी मान्सूनचे आगमन झालं होत. यंदा मात्र मान्सून लवकर केरळमध्ये दाखल झाला आहे. आता पुढील चार ते पाच दिवसांत कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. मुंबईत १ जूनपर्यंत मान्सूनची एंट्री होऊ शकते.