हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Monsoon Destinations) कडक उन्हाळ्याने सगळेच हैराण झाले आहेत. त्यामुळे सगळेच आ वासून चातकासारखी पावसाची वाट पाहत आहेत. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने लवकरच राज्यातील तळ कोकणात मान्सून दाखल होणार असे सांगितल्याने एक वेगळाच हर्ष निर्माण झाला आहे. पाऊस येणार म्हटलं की, एक वेगळाच आनंद वाटतो. मातीचा सुगंध आणि बहरणारी हिरवळ हे पावसाचे वैशिट्य. एकंदरीत पावसाळा आला की, वातावरण प्रफुल्लित होते आणि पर्यटकांची पावले आपोआप हिरवाईकडे वळतात.
पावसाळ्यात बरेच लोक मस्त पिकनिक प्लॅन करतात. कुणी राज्यात तर कुणी देशभरातील विविध पर्यटनस्थळी फिरायला जातं. (Monsoon Destinations) तुम्हीही अशी ट्रिप प्लॅन करत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी. कारण आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील टॉप ३ पावसाळी पिकनिक स्पॉटची माहिती देणार आहोत. जिथे पावसाळ्यात फिरायला जाणे खरोखरच आल्हाददायी आहे. चला तर जाणून घेऊया.
पाचगणी
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील सर्वात सुंदर पर्यटन स्थळ म्हणजे पाचगणी. पावसाळ्यात या ठिकाणचे सौंदर्य प्रचंड वाढते. त्यामुळे पावसाळ्यात इथे येणाऱ्या पर्यटकांची गर्दी मोठी असते. हे एक हिल स्टेशन आहे. (Monsoon Destinations) जे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील पाच टेकड्यांनी वेढलेले आहे. इथे मस्त पावसाळ्यात फिरण्यासारखे बरेच स्पॉट आहेत. यामध्ये टेबल लँड, सिडनी पॉइंट, भिलार फॉल्स, पारसी पॉइंट आणि राजपुरी लेणी या ठिकाणांचा समावेश आहे.
ताम्हिणी घाट
पावसाळ्यात हिरवळ, डोंगर दऱ्या, धबधबे आणि धरणे पाहण्यासारखी असतात. असे अलौकिक नैसर्गिक सौंदर्य अनुभवायचे असेल तर ताम्हिणी घाटात जरूर जा. या घाटातील नैसर्गिक सौंदर्यता कमालीची आहे. (Monsoon Destinations) पावसाळ्यात येथील मनमोहक दृश्य तुमच्या ट्रीपला आनंदयात्रा बनवतील इतकं नक्की.
इगतपुरी (Monsoon Destinations)
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी हे ठिकाण देखील पावसाळ्यात फिरण्यासारखे आहे. या भागातील नैसर्गिक सौंदर्य मनाला भावणारे आहे. त्यामुळे जर तुम्ही यंदाच्या पावसाळ्यात ट्रीप काढायच्या तयारीत असाल तर इगतपुरीला नक्की जा. या ठिकाणाच्या आसपास अप्पर वैतरणा धरण, भंडारदरा धरण, सुंदरनारायण गणेश मंदीर, कुलंग, अलंग, मदनगड, कळसूबाई, रतनगड या उत्तुंग डोंगररांगा आहेत. तसेच सांदण दरी, रंधा धबधबादेखील अत्यंत सुंदर स्पॉट आहेत. ज्यांना भेट द्यायला विसरू नका.