Monsoon Picnic Spot| पावसाळा ऋतू सुरू झाला की पर्यंतकांचे पाय आपोआप निसर्गरम्य ठिकाणांकडे वळतात. तसेच, धबधबे आणि डोंगरदऱ्यातील हिरवाई पाहण्यासाठी महाराष्ट्रात पर्यटकांची चांगलीच गर्दी जमते. पावसाळ्याच्या काळामध्ये महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे पर्यटकांना भुरळ पाडतात. ही पर्यटन स्थळे नेमकी कोणती असतात?? तेथे पाहण्यासारखे नेमके काय आहे?? याचविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. (Monsoon Picnic Spot)
भीमाशंकर – पुणे जिल्ह्यामधील भीमाशंकर हे पर्यटन स्थळ पावसाळ्यात मनमोहीत करून टाकते. भीमाशंकर या ठिकाणी शंकराचे एक सुंदर असे मंदिर आहे. या मंदिराला भेट देण्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक येत असतात. पावसाळ्याच्या वातावरणामध्ये तर मंदिर आणि मंदिराचा परिसर पर्यटकांना भुरळ पडतो. भीमाशंकर हे निसर्ग सौंदर्याचे परिपूर्ण आणि समृद्ध उदाहरण आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात याठिकाणी नक्की भेट द्यायला जावा. याठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला धबधबे, डोंगर-दर्या, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा अनुभवायला भेटेल.
चिखलदरा – विदर्भ भागातील एकमेव थंडगार हवेचे ठिकाण म्हणजेच चिखलदरा. पावसाळ्यात महाराष्ट्रातील अनेक पर्यटक चिखलदऱ्याला भेट देण्यासाठी जात असतात. आजच्या घडीला चिखलदरा हे सुंदर पर्यटक स्थळांमध्ये गणले जाते. (Monsoon Picnic Spot) तुम्हाला जर शहराच्या गोंधळापासून सुटका करायची असेल आणि एखाद्या निवांत ठिकाणी भेट द्यायची असेल तर चिखलदरा हा चांगला पर्याय आहे. येथे गेल्यानंतर तुम्हाला निसर्ग सौंदर्याचे अद्भुत रूप पाहायला मिळेल.
भंडारदरा – पावसाळ्यामध्ये पिकनिकला जाण्यासाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन आहे ते म्हणजे भंडारदरा. हे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यामध्ये वसलेले आहे. (Monsoon Picnic Spot) पावसाळा ऋतुचा मन मुराद आनंद लुटण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक लोक या ठिकाणाला भेट देण्यासाठी जातात. खास म्हणजे, पावसाळा सुरू झाला की या ठिकाणी काजवा महोत्सव भरतो. या महोत्सवाला महाराष्ट्रातूनच नाही तर भारतातून लोक येत असतात.