Monsoon Places : महाराष्ट्रातले आवर्जून पाहावे असे मान्सून स्पॉट्स ; ये नही देखा तो कुछ नही देखा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Monsoon Places : महाराष्ट्र म्हणजे डोंगर , दऱ्यांचा प्रदेश. पावसाळ्यात येथील निसर्गाचं रुपडं म्हणजे क्या बात है ! पावसाळयात महाराष्ट्रातली काही ठिकाणं म्हणजे स्वर्गा समान… सुंदर हिरव्या डोंगर रांगा, धबधब्यांचे कोसळणारे पाणी, अधून मधून ऊन सावल्यांचा खेळ आणि जमिनीला स्पर्श करणारे ढग असं सुंदर पावसाळी वातावरण तुमचं आनंदित करून जातील यात शंका नाही. चला तर मग जाणून घेऊया महाराष्ट्रातली (Monsoon Places) काही अप्रतिम ठिकाणं जिथे पावसाळ्यात आवर्जून भेट दिली पाहिजे.

भंडारदरा (Monsoon Places)

महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोला तालुक्यात प्रवरा नदीच्या परिसरात हे सुंदर असं ठिकाण आहे पावसाळ्यात भंडारदरा मधलं निसर्ग सौंदर्य अधिकच खुलून येतं तुम्ही या ठिकाणी पावसाळ्यात आवर्जून भेट दिली पाहिजे.

आंबोली

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये भेट देण्यासारखं अतिशय सुंदर असं ठिकाण म्हणजे (Monsoon Places) आंबोली. उंच उंच डोंगरदऱ्या, घाट रस्ते, धबधबे हे इथलं सौंदर्य पर्यटकांना नेहमीच खुणावतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं हे ठिकाण पावसाळी पर्यटनासाठी अतिशय प्रसिद्ध आहे.

गगनबावडा (Monsoon Places)

गगनबावडा म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातलं हिल स्टेशन असं आपण म्हणू शकतो. येथील थंडगार आणि अल्हाददायक वातावरण तुमचं मन प्रसन्न करून टाकेल. येथे वाहणारा जोरदार वारा तुम्ही क्वचितच अनुभवला असेल. येथे गगनगिरी महाराजांचा (Monsoon Places) मठ देखील पाहण्यासारखा आहे.

लोणावळा खंडाळा

पुणे आणि मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांचं पावसाळ्यात फिरण्यासाठीचं (Monsoon Places) आवडतं डेस्टिनेशन म्हणजे लोणावळा आणि खंडाळा. पावसाळ्यात इथं आवर्जून पर्यटक भेट देत असतात. मात्र इथे भेट देणाऱ्या पर्यटकांनी प्रशासनानं घातलेल्या अटी आणि नियमांचे पालन आवर्जून केलं पाहिजे.

महाबळेश्वर (Monsoon Places)

सातारा जिल्ह्यातलं कुलेस्ट प्लेस म्हणजे महाबळेश्वर… इथे पाहण्यासारखी बरीच ठिकाण आहेत. येथील हवामान आणि निसर्गरम्य परिसर पाहून तुम्ही नक्कीच आनंदून जाल. पावसाळ्यात इथे धबधबे प्रवाहित होतात शिवाय सर्वत्र धुक्याची चादर पसरते. हिवाळ्याच्या (Monsoon Places) दिवसात कास पठार सुद्धा अगदी पाहण्यासारखे ठिकाण आहे.