Redmi 13 5G : 108MP कॅमेरा, 8GB RAM सह Redmi 13 5G भारतात लॉन्च, किंमत किती पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Xiaomi कंपनीचे मोबाईल भारतात खुपच लोकप्रिय आहेत. कमी किमतीत भन्नाट फीचर्स मिळत असल्याने ग्राहकांची मोठी पसंती Xiaomi च्या मोबाईलला पाहायला मिळते. ग्राहकांची वाढती मागणी पाहून कंपनी सुद्धा सतत नवनवीन आणि अपडेटेड फीचर्सने सुसज्ज असे मोबाईल लाँच करत असते. त्याच पार्श्वभूमीवर आता Xiaomi ने Redmi 13 5G मोबाईल भारतीय बाजारात आणला आहे. 108MP कॅमेरा, 8GB RAM सह अनेक दमदार फीचर्स या स्मार्टफोनमध्ये देण्यात आले आहेत. चाल तर मग रेडमीच्या या मोबाईलचे खास स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात.

6.79 इंचाचा डिस्प्ले –

Redmi 13 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.79 इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2460 x 1080 पिक्सल रेझोल्यूशन सह येत असून यामध्ये 550 nits पीक ब्राइटनेस आणि 91% स्क्रीन ते बॉडी रेशो मिळतो. फोनच्या डिस्प्लेला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे संरक्षण देण्यात आलं आहे. कंपनीने मोबाईल मध्ये Snapdragon 4 Gen 2 AE प्रोसेसर वापरला असून Xiaomi हा स्मार्टफोन Android 14 OS या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. यामध्ये 8GB आणि SD कार्डद्वारे 1 TB पर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळतेय.

कॅमेरा – Redmi 13 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Redmi 13 5G मध्ये पाठीमागील बाजूला 108 MP चा मुख्य कॅमेरा आणि 2MP चा मायक्रो कॅमेरा देण्यात आलाय तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 13 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 5030 mAh बॅटरी देण्यात आली आली हि बॅटरी 33 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती?

आता राहिला प्रश्न तो म्हणजे मोबाईलच्या किमतीचा, तर Redmi 13 5G च्या 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 13,999 रुपये आहे तर 8GB + 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 15,499 रुपये आहे. हा स्मार्टफोन काळ्या, निळ्या आणि सोनेरी रंगात उपलब्ध असून तुम्ही 12 जुलैपासून Amazon.in, mi.com आणि Xiaomi रिटेल वरून खरेदी करू शकता.