गुड न्यूज! मान्सून १ जूनला केरळात दाखल होणार; हवामान विभागाचा अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । शेतकरी वर्गासाठी एक खुशखबर मिळत आहे. भारतात मान्सून दाखल होण्यासाठी अतिशय अनुकूल वातावरण निर्माण असून मान्सून १ जूनला केरळ दाखल होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. याआधी हवामान विभागाने मान्सून केरळमध्ये ५ जूनला दाखल होईल, असा अंदाज वर्तवला होता. दरम्यान, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे वादळी वारे वाहण्याती शक्यता आहे, असंही हवामान विभागानं म्हटलं आहे.

याचबरोबर यंदा देशात सरासरी इतका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागने गेल्या महिन्यात वर्तवला होता. देशात अजूनही निम्म्याहून अधिक शेती सिंचनाखाली आहे. त्यामुळं अशी कोरडवाहू शेती  ही मान्सूनच्या पाण्यावर होते. या शेतजमिनी कुठल्याही सिंचन योजनांखाली नाही आहे. यामुळे जून ते सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या पावसावर जमिनींवरील शेती अवलंबून आहे.

शेतजमिनींवर खासकरून भात, मका, ऊस, कापूस आणि सोयिबीनची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. यामुळे मान्सून वेळत दाखल होत असल्याने शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे. सध्या देश करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहे. अशा वेळी मान्सून वेळेत दाखल होत असल्याने शेतकऱ्यांसह सरकार आणि जनतेलाही दिलासा मिळणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment