विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले; नेमकं कारण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य विधिमंडळाचे 18 जुलैपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय विधिमंडळ सचिवालयाने घेतला आहे. या अधिवेशनाची पुढील तारीख संसदीय कार्य विभागाने कळविल्यानंतर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. दरम्यान, शिंदे- भाजप सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार रखडल्यामुळेच हे अधिवेशन पुढे ढकलल्याचे कारण असल्याची चर्चा सुरू आहे.

मुंबईत नुकतेच राज्य विधीमंडळाचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन पार पडले. यावेळी आगामी पावसाळी अधिवेशन येत्या 18 जुलैपासून सुरू होईल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, यादिवशी राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक होणार असल्याने जुलैच्या शेवटच्या किंवा आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात अधिवेशन सुरू होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

Legislature Principal Secretary letter

विधिमंडळ सचिवालयाने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, संसदीय कार्य विभागाच्या सूचनेनूसार हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. पण अधिवेशनाची तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही. संसदीय कार्य विभागाने कळवल्यानंतर पुढची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.

Leave a Comment