Monsoon Tourism Places In Maharashtra : लॉँग विकेंडला फिरायला जाताय? पावसाळ्यातील 5 बेस्ट ठिकाणे पहाच

Monsoon Tourism Places In Maharashtra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Monsoon Tourism Places In Maharashtra । मित्रानो, उद्या १५ ऑगस्ट आणि त्यानंतर शनिवार- रविवार…. म्हणजेच काय तर सलग ३ दिवस सुट्टी… आता ३ दिवस सुट्टी म्हंटल्यावर फिरायला जाण्याची इच्छा तर होणारच ना… खास करून मुंबई पुण्यातील नोकरदार वर्ग तर या सुट्ट्यात हमखास कुठेतरी फिरण्याचा प्लॅन आखतोच… पण सध्याच्या पावसाळयाच्या दिवसात फिरायला जायचं तर नेमकं कुठं जायचं?? निसर्गाच्या सानिध्यात जाऊन मनसोक्त मजा कुठे करायची? याबाबत आपल्या मनात नेहमीच गोंधळ उडतो. परंतु चिंता करू नका… मुंबई पुणे शेजारील ५ बेस्ट पर्यटन स्थळे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्याठिकाणी जाऊन तुम्ही फुल्ल एन्जॉय करू शकता.

१) अलिबाग / काशीद बीच –

मुंबईपासून 95–120 किमी अंतरावर असलेला हा बीच पर्यटनाचे खास आकर्षण आहे. अथांग समुद्रकिनारा, आसपास मुरूड जंजिरा सारखा किल्ला.. आणि मुंबईत पुण्यापेक्षा वेगळं वातावरण यामुळे कायमच अलिबागला पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळते. मुंबईपासून फेरीने सहज याठिकाणी पोहोचता येईल. अलिबागमध्ये पॅरासेलिंग, जेट स्की, बोटिंग, कायाकिंग, वॉटर स्कूटर आणि स्कूबा डायव्हिंगसारख्या साहसी खेळांची सोय आहे, ज्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता.

२) बदलापूर – Monsoon Tourism Places In Maharashtra

तुम्हाला माहिती नसेल तर फिरण्यासाठी आणि सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी बदलापूर सुद्धा बेस्ट ठिकाण आहे. कोंडेश्वर मंदिर आणि धबधबा, भोज धरण, कार्णाळा पक्षी अभयारण्य, भगीरथ धबधबा, बारवी धरण हि इथली प्रमुख आकर्षणे आहेत. याशिवाय बदलापूर मध्ये अनेक उत्तम रिसॉर्ट अगदी परवडणाऱ्या दरांमध्ये उपलब्ध आहेत. बदलापूर मधील मुळगाव या गावाजवळ वसलेले खंडोबाचे मंदिर उंच टेकडीवर असल्याने आसपासचे नयनरम्य दृश्ये दिसतात.

३) लोणावळा – खंडाळा

मुंबईपासून ८५ किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण म्हणजे पर्यटकांचं सर्वात आवडत ठिकाण…. याठिकाणी तुम्ही भुशी डॅम, राजमाची पॉईंट, लायन आणि टायगर पॉईंट, लोणावळा लेक, राजमाची किल्ला ट्रेक, विसापूर आणि लोहगड ट्रेक्स, यांसारखी दृश्ये पाहू शकता… मनमोहक दृश्याचे फोटो काढू शकता. पावसाळ्याच्या दिवसात हिरवाई, धबधबे आणि धुके—शहरी गोंधळापासून सुटका मिळवायची असेल लोणावळा तुमच्यासाठी उत्तम ठिकाणं ठरेल. लोणावळ्यात जेवणाचीही उत्तम सोय असल्याने तुमची ट्रिप वाया जाणार नाही.

४) इगतपुरी –

पावसाळ्यात महाराष्ट्रात फिरण्यासाठी (Monsoon Tourism Places In Maharashtra) असणाऱ्या ठिकाणांपैकी इगतपुरी हे अत्यंत सुंदर असे ठिकाण आहे. ध्यान, निसर्ग, इतिहास आणि साहसाचा अप्रतिम संगम म्हणजे इगतपुरी… मुंबई- नाशिक मार्गावर असलेल्या इगतपुरीत दरवर्षी हजारो लोक पर्यटनासाठी येतात. इगतपुरी शहराला फॉग सिटी म्हणून सुद्धा ओळखले जाते. डोंगरांच्या कुशीत वसलेल्या या शहराच्या जवळपास अनेक धबधबे आहेत. पावसाळ्यात त्याचे सौदर्यं पर्यटकांना खास अनुभव देते. इगतपुरीचा भावली धबधबा पर्यटकांसाठी बेस्ट ठिकाण आहे. येथील अद्भूत दृश्य डोळ्यांत साठवण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात.

५) कर्जत –

मुंबईपासून साधारण 100-110 किमी अंतरावर असलेलं कर्जत हे महाराष्ट्रातील एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. येथे अनेक डोंगर, दऱ्या, नयनरम्य दृश्ये आणि हिरवीगार निसर्गरम्यता आहे. पावसाळ्यात (जून ते सप्टेंबर) पर्यटनासाठी हे उत्तम ठिकाण आहे. कर्जतमध्ये तुम्ही ट्रेकिंग, कॅम्पिंग, अशा विविध ऍक्टिव्हिटी करू शकता. परंतु खबरदारी घेणेही गरजेचं आहे. पावसाळ्यात ट्रेक करताना पायासाठी चांगले, घसरणरोधक शूज वापरा, म्हणजे तुम्ही चालताना घसरणार नाही. पर्यटनानंतर कर्जतमध्ये राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय सुद्धा चांगली आहे. बरेच व्हिला आणि रिसॉर्ट इथं मुक्कामासाठी तुम्हाला उपलब्ध असतील. तसेच जेवणाचं सांगायचं झाल्यास, कर्जत परिसरात खासकरून मटणाची करी फारच लोकप्रिय आहे. तसेच शाकाहारी लोकांसाठी गरम पिठलं-भाकरी, उसळवर तुम्ही ताव मारू शकता.