Monsoon Tourist Spots : पावसाळ्यात फिरायला जायचंय? तर ‘या’ ठिकाणांना भेट द्या; सौंदर्य असे की हरवून जाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Monsoon Tourist Spots) पावसाळ्यात निसर्गाचे सौंदर्य अधिकच खुलून येते. सर्वत्र हिरवळ, छोटे मोठे धबधबे आणि थंडगार हवेची झुळूक मनाला विशेष आनंद देते. त्यामुळे पावसाळा म्हटलं की, सल्याने फिरायला जाण्याचे वेध लागतात. आपसूकच आपली पाऊले निसर्गरम्य ठिकाणांकडे वळतात. आता अवघ्या काही दिवसांवर मान्सून येऊन ठेपला आहे. त्यामुळे सगळेच विकेंड प्लॅनिंग करत असतील. पावसाळ्यात मस्त रिमझिम सरींचा आल्हाददायी अनुभव घ्यायचा असेल तर निसर्गाच्या सानिध्यात जायला हवे. मग कुठे जायचं? असा प्रश्न पडणे साहजिक आहे. याच प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. पावसाळ्यात महाराष्ट्रात एक्स्प्लोर करता येतील अशा काही निसर्गरम्य ठिकाणांची आज आपण माहिती घेऊया.

माळशेज घाट (Monsoon Tourist Spots)

पावसाळ्यात निसर्गाला अगदी जवळून अनुभवायचं असेल तर माळशेज घाटाचं निसर्ग सौंदर्य याची देही याची डोळा पहायलाच हवे. अंगावर पावसाच्या रिमझिम सारी घेत. थंडीने अंगावर उभा राहणारा काटा आणि ढगांच्या ओलसर धुकट वातावरणात तुम्ही कधी हरवून जाल तुमचं तुम्हाला कळणार नाही. सर्वत्र हिरवळ आणि त्यातून दूरवर जाणारी मोहक वळणदार वाट तुम्हाला एक अनोखा आनंद देते. अगदी पृथ्वीवर स्वर्गसुखाची अनुभूती हवी असेल तर पावसल्युट माळशेज घाटात जायलाच हवे.

आंबोली घाट

पावसाळ्यात आंबोली घाटात जाण्याची मजाच काही वेगळी आहे. अत्यंत थंड वातावरण, शांत आणि प्रसन्नतेचि अनुभूती देतं. हिरण्यकेशी धबधबा, आंबोली धबधबा आणि नांगरतास धबधबा ही पावसाळ्यातील पर्यटकांची प्रमुख ठिकाणं आहेत. (Monsoon Tourist Spots) शिवाय घाटात अनेक प्रजातींचे पक्षी, फुलपाखरं, दऱ्या आणि टेकड्यांचे सुंदर दृश्य पहायला मिळते. पावसाळ्यात इथे दाट धुक्याची चादर पसरते. यातून रस्त्या काढत जाताना वाटणारी मजा शब्दात व्यक्त करता येण्यासारखी नाही.

लोणावळा – खंडाळा

सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावर असलेले लोणावळा आणि खंडाळा हे मुंबई आणि पुण्यापासून अगदी जवळ असणारी थंड हवेची ठिकाणं आहेत. जिथे कोणत्याही मोसमात फिरायला जायला मजा येते. पण पावसाळ्यात या ठिकाणांचं रुपडं इतकं सुंदर दिसत की, फिरायला गेल्यानंतर पुन्हा परतून येऊच वाटत नाही. (Monsoon Tourist Spots) पावसाळ्यात इथे टायगर पॉईंट, लायन पॉईंट, भुशी डॅम, वाळवळ डॅम या ठिकाणांना तर आवर्जून भेट द्यावी. चहुबाजूने हिरवळ, थंडगार हवा, धुक्याची मखमली चादर, डोंगरमाथ्यावरुन कोसळणारे लहान मोठे धबधबे ही दृश्य मनाला स्पर्श करणारी ठरतील.

माथेरान

बरेच लोक पावसाळ्यात माथेरानला ट्रेकिंगसाठी जातात. कारण इथली घनदाट झाडी, सर्वत्र पसरलेली हिरवाई, लाल पायवाटा आणि त्यात दात धुकं आपल्याला आकर्षित करत. पावसाळ्यात इथे शार्लोट लेक, पॅनारोमा पॉईंट, लुईझा पॉईंट, सनसेट पॉईंट ही ठिकाणे फारच सुंदर दिसतात. (Monsoon Tourist Spots) इथून दिसणारी डोंगरदऱ्यांची दृश्य मनाला अगदी भुरळ घालतात. त्यामुळे पावसाळा आला की, माथेरानला एकदा नक्की जा.

इगतपुरी

पावसाळ्यात एक्स्प्लोर करायला इगतपुरी हे एक अत्यंत सुंदर ठिकाण मानले जाते. रस्त्यालगत वाहणारे छोटे छोटे धबधबे, हिरव्यागार पर्वतरांगा आणि थंड वातावरण तुम्हाला मोहात पाडेल. इगतपुरी म्हणजे फॉग सिटी याचा प्रत्यय तुम्हाला पावसाळ्यात मिळेल. (Monsoon Tourist Spots) इथले धबधबे, गडकिल्ले, भंडारदरा धरण, कळसूबाई शिखर, भावली धरण, भावली धबधबा, सांधण व्हॅली, कसारा घाट ही स्थळं पर्यटकांना प्रचंड आकर्षित करतात. ही दृश्य पाहताना आपण स्वप्नात तर नाही ना असेच अनेकदा वाटते.

भीमाशंकर

पावसाळ्यात भीमाशंकरचे जंगल जरूर एक्स्प्लोर करा. कारण सदाबहार अभयारण्य, हिरवा निसर्ग, खळखळणाऱ्या नद्या तुम्हाला इथेच पहायला मिळतील. देवस्थान, हिल स्टेशन आणि वन्य प्राणी यांची संपदा असलेलं भीमाशंकर पावसाळ्यात इतकं खुलून येत की, इथला परिसर डोळ्यांचे पारणे फेडतो. (Monsoon Tourist Spots) त्यामुळे हिरवा निसर्ग अनुभवायचा असेल तर पावसाळ्यात भीमाशंकरला जरूर जा.