Monsoon Update : आला रे आला!! मान्सून केरळात दाखल; हवामान खात्याची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देशासाठी आणि देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. २०२४ चा मान्सून (Monsoon Update) अखेर भारतात दाखल झाला आहे. यंदा २ दिवस आधीच मान्सूनचे आगमन झालं असून तो केरळमध्ये आणि ईशान्य भारतात एकाच वेळी दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबत माहिती दिली आहे. उन्हाच्या कडाक्याने हैराण झालेला बळीराजा गेल्या काही दिवसापासून अगदी चातकाप्रमाणे मान्सूनची वाट बघत होता, अखेर मान्सून भारतात आला असून शेतकऱ्यासाठी ही मोठी आनंदाची बाब आहे.

भारतीय हवामान खात्याने ट्विट करत म्हंटल कि, नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे आणि आज 30 मे 2024 रोजी ईशान्य भारताच्या बहुतांश भागात पुढे सरकला आहे. मान्सून केरळ आणि ईशान्य भारतात मध्ये दाखल झाल्याने आता अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, आसाम, मेघालय या राज्यांमध्ये पाऊस ५ जून रोजी हजेरी लावण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये १० जूनपर्यंत मान्सून दाखल (Monsoon Update) होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

बळीराजाला होणार फायदा – Monsoon Update

भारताच्या शेतीसाठी हा मान्सून खूप महत्त्वाचा आहे, कारण देशातील 52 टक्के लागवडीयोग्य क्षेत्र मान्सूनवर अवलंबून आहे. तसेच, देशभरातील पिण्याचे पाणी आणि वीज निर्मितीसाठी आवश्यक असलेले जलाशय भरण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. जून आणि जुलै हे शेतीसाठी सर्वात महत्त्वाचे मान्सून महिने आहेत कारण खरीप पिकांच्या बहुतेक पेरण्या याच काळात होतात. त्यामुळे वेळेत मान्सून दाखव व्हावा अशी इच्छा देशभरातील बळीराजाची असते.