Monsoon Update | महाराष्ट्रातील या ठिकाणी पडणार 100 % पाऊस, हवामान विभागाने वर्तवला अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Monsoon Update | दरवर्षी 31 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होतो. परंतु यावर्षी एक दिवस आधीच म्हणजे 30 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. परंतु या निकालासोबतच शेतकऱ्यांचे लक्ष मान्सूनच्या आगमनाकडे आहे. कारण सध्या देशभरात उष्णतेने कहर केलेला आहे. तापमानाचा पारा काही भागात 50° c एवढा पोहोचलेला आहे. त्यामुळे आता मान्सूनचे आगमन कधी होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. केरळमध्ये मान्सून पोहोचलेला आहे. परंतु इतरत्र पाऊस कधी पडणार आहे? असा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे.

मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर दक्षिणेकडून गोव्या मार्गे कोकणातून मान्सून महाराष्ट्रात दाखल होतो. केरळमध्ये आल्यानंतर साधारण 8 ते 10 दिवसांनी महाराष्ट्र मध्ये पाऊस येत असतो. त्यामुळे यावर्षी आठ ते दहा जून रोजी मान्सून महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. यावर्षी मान्सूनबाबत हवामान विभागाने काही अंदाज वर्तवलेले आहे. त्यानुसार यावर्षी कोकण नाशिक चंद्रपूरमध्ये 100 टक्के पाऊस कोसळणार आहे. त्याचप्रमाणे राज्यातील उर्वरित भागात 95 ते 98 टक्के पाऊस पडणार आहे. पुण्यात सुद्धा 100 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे.

यावर्षी जून ते जुलै महिन्यात साधारण पाऊस पडेल. परंतु ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडण्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवण्यात आलेला होता. मागील वर्षी पावसाचे प्रमाण खूप होते. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु यावर्षी मुबलक प्रमाणात पाऊस पडणार आहे. उष्णतेने अनेक लोकांना आजार देखील होत आहे. त्यामुळे सगळेचआता या उकड्यापासून सुटका मिळण्यासाठी पावसाची वाट पाहत आहेत.