‘या’ सरकारी योजनेद्वारे मिळू शकेल 10 हजार रुपये मंथली पेन्शन, कसे मिळवावे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सध्याच्या आर्थिक अनिश्चिततेच्या काळात बहुतेक लोकं रिटायरमेंटनंतरचे प्लॅनिंग करत असतात. खाजगी नोकऱ्या किंवा छोटे व्यवसाय असलेल्यांना वृद्धापकाळाच्या खर्चाची चिंता असते. जर तुम्ही रिटायरमेंटनंतरच्या पेन्शनचा विचार करत असाल तर अटल पेन्शन योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकते.

कमी गुंतवणुकीत पेन्शनची गॅरेंटी देण्यासाठी ही योजना जास्त चांगली दिसते. सध्या, अटल पेन्शन योजनेअंतर्गत, सरकार 60 वर्षांनंतर दरमहा 1000 ते 5000 रुपये पेन्शनची गॅरेंटी देते. म्हणजेच वर्षाला तुम्हाला 60,000 रुपये पेन्शन मिळेल. जर पती-पत्नी दोघेही गुंतवणूक करत असतील तर दोघांनाही पेन्शन मिळू शकेल. म्हणजेच, जर तुम्ही 10 हजार रुपये गुंतवले तर तुम्हाला वार्षिक 1,20,000 रुपये आणि मासिक 10,000 रुपये पेन्शन मिळेल. सरकारच्या या योजनेत 40 वर्षांपर्यंतची व्यक्ती अर्ज करू शकते. अटल पेन्शन योजनेचे फायदे जाणून घेऊयात ..

60 नंतर वार्षिक 60,000 रुपये पेन्शन दिली जाईल
अटल पेन्शन योजनेचा उद्देश प्रत्येक विभागाला पेन्शनच्या कक्षेत आणणे आहे. मात्र, पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) ने सरकारला अटल पेन्शन योजना (APY) अंतर्गत जास्तीचे वय वाढवण्याची शिफारस केली आहे.

या योजनेंतर्गत, रिटायरमेंटनंतर दरमहा खात्यात निश्चित योगदान दिल्यानंतर, 1 हजार रुपये ते 5 हजार रुपये मासिक पेन्शन मिळेल. सरकार दर 6 महिन्यांत केवळ 1239 रुपये गुंतवल्यानंतर 60 वर्षांनंतर प्रति महिना 5000 रुपये म्हणजेच वार्षिक 60,000 रुपये आजीवन पेन्शनची गॅरेंटी देत ​​आहे.

दरमहा द्यावे लागतील 210 रुपये
सध्याच्या नियमांनुसार, वयाच्या 18 व्या वर्षी, मासिक पेन्शनसाठी योजनेत जास्तीत जास्त 5000 रुपये जोडल्यास, तुम्हाला दरमहा 210 रुपये द्यावे लागतील. हेच पैसे दर तीन महिन्यांनी दिले तर 626 रुपये आणि सहा महिन्यांत 1,239 रुपये द्यावे लागतील. मासिक 1,000 रुपये पेन्शन मिळवण्यासाठी, तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी गुंतवणूक केल्यास, तुम्हाला दरमहा 42 रुपये द्यावे लागतील.

तरुण वयात सामील झाल्यास जास्त फायदे मिळतील
समजा तुम्ही वयाच्या 35 व्या वर्षी 5 हजार पेन्शनसाठी सामील झालात तर 25 वर्षांसाठी तुम्हाला दर 6 महिन्यांनी 5,323 रुपये जमा करावे लागतील. अशा परिस्थितीत तुमची एकूण गुंतवणूक 2.66 लाख रुपये असेल, ज्यावर तुम्हाला 5 हजार रुपये मासिक पेन्शन मिळेल. तर वयाच्या 18 व्या वर्षी सामील झाल्यावर तुमची एकूण गुंतवणूक फक्त 1.04 लाख रुपये असेल. म्हणजेच, त्याच पेन्शनसाठी सुमारे 1.60 लाख रुपये जास्त गुंतवावे लागतील.

सरकारी योजनेशी संबंधित इतर गोष्टी –

– तुम्ही पेमेंटसाठी, मासिक गुंतवणूक, त्रैमासिक गुंतवणूक किंवा अर्धवार्षिक गुंतवणूक हे 3 प्रकारचे प्लॅन निवडू शकता.

– इन्कम टॅक्स सेक्शन 80CCD अंतर्गत, त्यावर कर सवलतीचा लाभ मिळतो.

– एका सदस्याच्या नावाने फक्त एकचा खाते उघडले जाईल.

– जर सदस्याचा मृत्यू 60 वर्षापूर्वी किंवा नंतर झाला असेल तर पेन्शनची रक्कम त्याच्या पत्नीला दिली जाईल.

– सभासद आणि पत्नी दोघांचा मृत्यू झाल्यास सरकार नॉमिनी व्यक्तीला पेन्शन देईल.

Leave a Comment