हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Moong Farming | आपल्या भारताला कृषीप्रधान देशाचे म्हटले जाते. कारण आपल्या देशातील जवळपास 75 टक्के लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून असते. आपल्याकडे शेतकरी साधारण वर्षातून दोनदा पीक घेतात. ज्यामध्ये खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम असे दोन हंगाम पडतात बहुतेक शेतकरी हे रब्बी हंगामात पिके घेत असतात. आणि नंतर तीन ते चार महिन्यात त्यांचे शेत रिकामे ठेवतात. परंतु शेतकऱ्यांची इच्छा असेल, तर उन्हाळी हंगामात देखील कमी खर्चात मुगाची लागवड करून ते खूप चांगला नफा कमवू शकतात.
मुग आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे असतात ज्यामध्ये ज्यामध्ये फ्लेव्होनॉइड्स, फेनोलिक ॲसिड, ऑर्गेनिक ॲसिड, अमीनो ॲसिड, कार्बोहायड्रेट्स आणि लिपिड्स सारख्या पोषक घटकांचा समावेश आहे. याशिवाय मूगमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीमाइक्रोबियल, अँटी-इंफ्लेमेटरी, ॲन्टीडायबेटिक, अँटीहाइपरटेन्सिव्ह आणि अँटीट्यूमर गुणधर्म आढळतात. यामुळे अनेक आजार दूर राहतात.
सीतामढी येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ राम ईश्वर प्रसाद म्हणाले की, मुगाच्या अनेक सुधारित जाती आहेत. ज्यामध्ये विराट, IPM 0203, सम्राट, SML 668 यांचा समावेश आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळेल. सध्या डाळींच्या क्षेत्रात भारत अजून स्वावलंबी झालेला नाही. त्यामुळे डाळींचे क्षेत्र वाढवण्याची गरज आहे. मूग लागवडीमुळे जमिनीची सुपीकता वाढते. याचे कारण म्हणजे मुग सारख्या कडधान्य पिकांच्या मुळांच्या ग्रंथींमध्ये रायबियम जिवाणू आढळतात. त्यामुळे शेताची खत क्षमता वाढण्यास मदत होते.
मुगाची पेरणी कधी करायची?
शास्त्रज्ञ राम ईश्वर प्रसाद यांच्या मते, मूग पेरताना शेतात कोणत्याही प्रकारचे तण नसावे. त्यामुळे मूग उत्पादनात सुधारणा होते. उन्हाळा सुरू होताच मुगाची लागवड करावी. १५ एप्रिल ते १५ जूनपर्यंत पेरणी करता येते. खर्च खूपच कमी आहे आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात नफा मिळवू शकतात.