बाधितांपेक्षा कोरोनामुक्त जादा : सातारा जिल्ह्यात आज 2 हजार 337 नागरिकांना डिस्चार्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 2337 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात

जावली 44 (7728), कराड 253 (22896), खंडाळा 77 (10600), खटाव 182 (16386), कोरेगांव 191 (14659),माण 90 (11734), महाबळेश्वर 27 (4077), पाटण 130 (7158), फलटण 188 (26752), सातारा 273 (36036), वाई 70 (11740 ) व इतर 6 (1079) असे आज अखेर एकूण 170845 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसात

जावली 1 (170), कराड 9 (657), खंडाळा 0 (136), खटाव 7 (425), कोरेगांव 3 (325), माण 1 (217), महाबळेश्वर 0 (44), पाटण 0 (157), फलटण 0 (256), सातारा 7 (1064), वाई 0 (307) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3758 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

गुरूवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्याची स्थिती
सातारा जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 8 लाख 22 हजार 200 नमुने घेतले, त्यापैकी 1 लाख 70 हजार 845 बाधित आहेत. बाधितांपैकी 1 लाख 50 हजार 389 जणांना घरी सोडण्यात आलेले आहे. तर 3 हजार 758 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 16 हजार 677 बाधित उपचार घेत आहेत.

Leave a Comment