आमच्यापेक्षा लायक, पात्र लोक स्टेजच्या खाली बसलेले असतात : सुधीर मुनगंटीवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | भारतीय जनता पक्षात देवेंद्र फडणवीसाच्या पेक्षाही कार्यक्षम लोक आहेत. आमच्यापेक्षा जास्त लायक, पात्र लोक स्टेजच्या खाली बसलेले असतात. त्यामुळे आमच्यापैकी कोणताही नेता नाराज असूच शकत नाही. मला अजूनही वाटतं पकंजा ताई या शेवटच्या श्वासापर्यंत भाजपामध्येच राहतीलच पण पुढच्या जन्मही भाजपामध्येच असतील, असा विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

पकंजा मुंडे यांच्या पक्ष बदलण्याच्या विषयावरून त्यांनी एक व्हिडिअो ट्विट केला आहे. एका कार्यक्रमात त्यांनी या प्रश्नावर दिलेली प्रतिक्रिया त्यांनी ट्विट केली आहे. सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल झाला असून त्यामध्ये खासदार प्रितम मुंडे यांना संधी मिळण्याची शक्यता होती, मात्र ती संधी न मिळाल्याने पकंजा मुंडे नाराज असून त्या पक्ष सोडणार या चर्चा रंगल्या होत्या. प्रितम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामेही दिलेले होते. त्यामुळे पकंजा मुंडे पक्ष सोडणाक का यावर आ. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.

आ. मुनगंटीवार म्हणाले, गडकरी सांगतात दुसऱ्या पक्षात जाण्यापेक्षा विहीरीत उडी मारून जीव देईन, कारण आमची बांधिलकी विचारांशी आहे. आमची बांधिलकी पदाशी, स्वार्थाशी किंवा सत्तेशी नाही. आम्ही या जनसेवेच्या इमारतीचे पायाचे दगड समजून पक्षाला आयुष्य समर्पित करत असतात. आम्ही काही दिसतोय ते स्वतःच्या घरावर तुळशीपत्र नव्हे तुळशीची कुंडी ठेवून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भरवश्यावर हे आम्ही सर्व स्टेजवर दिसतो.

Leave a Comment