मणिपूरमधील भूस्खलनात 24 जणांचा मृत्यू तर 38 जण जखमी, लाईव्ह व्हिडिओ आला समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मणिपूर : वृत्तसंस्था – मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात रेल्वेच्या बांधकामाच्या ठिकाणी भूस्खलनामुळे (Landslide) मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 24 जणांचा मृत्यू झाला आहे तर 38 जण अजून बेपत्ता आहेत. यामध्ये टेरिटोरियल आर्मीच्या 18 जवानांचा समावेश आहे. लष्कर, आसाम रायफल्स, टेरिटोरियल आर्मी, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे जवान ढिगाऱ्याखाली (Landslide)अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

ढिगाऱ्याखाली (Landslide) अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी वॉल रडारचा वापर केला जात आहे. याशिवाय स्निफर डॉगचे पथकही तैनात करण्यात आलं आहे. आतापर्यंत 13 टेरिटोरियल आर्मीचे जवान आणि 5 नागरिकांना बाहेर काढण्यात आलं आहे. आतापर्यंत 18 टेरिटोरियल आर्मीचे जवान आणि 6 नागरिकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

या अपघातात प्राण गमावलेल्या लष्कराच्या जवानांमध्ये एक कनिष्ठ आयोग अधिकारी देखील आहे. हवाई दलाची दोन विमानं आणि लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे जेसीओसह 14 जवानांचे मृतदेह त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहेत. मृतदेह पाठवण्यापूर्वी त्यांना इंफाळमध्ये पूर्ण सन्मानाने लष्करी निरोप देण्यात आला. मणिपूरच्या इतिहासातील हा सर्वात भीषण अपघात (Landslide) असल्याचे समजत आहे.

हे पण वाचा :
देवेंद्रजींवर पांडुरंग नाराज आहे का, हा एक संशोधनाचा विषय

देवेंद्रजींचे पंख छाटले गेले नाहीत, तर..; तृप्ती देसाईंची पोस्ट चर्चेत

जोखीम असूनही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याछा सल्ला तज्ज्ञ का देतात??? जाणून घ्या

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती का? शिंदे म्हणतात….

शिवसैनिकांनो, मुंबई असो वा ठाणे…; दीपाली सय्यद यांचे भावनिक पत्र

Leave a Comment