कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीचा आकडा 1100

सकलेन मुलाणी । कराड

कराड । कृष्णा हॉस्पिटलमधून आज 24 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कृष्णा हॉस्पिटलमधून आत्तापर्यंत एकूण 1104 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांमध्ये नारायणवाडी येथील 75 वर्षीय पुरूष, कापील येथील 35 वर्षीय पुरूष, चोरे येथील 75 वर्षीय महिला, गुरूवार पेठ कराड येथील 35 वर्षीय पुरूष, मलकापूर येथील 35 वर्षीय पुरूष, 55 वर्षीय पुरूष, ओंड येथील 67 वर्षीय पुरूष, वाखाण रोड येथील 58 वर्षीय पुरूष, शिवनगर येथील 52 वर्षीय पुरूष, खुबी येथील 50 वर्षीय महिला, शुक्रवार पेठ कराड येथील 80 वर्षीय पुरूष, शनिवार पेठ कराड येथील 58 वर्षीय पुरूष, 56 वर्षीय महिला, 32 वर्षीय महिला, बुधवार पेठ कराड येथील 40 वर्षीय पुरूष, वडगाव येथील 36 वर्षीय महिला, सदाशिव कॉलनी कराड येथील 20 वर्षीय युवती, कसबा बावडा कोल्हापूर येथील 26 वर्षीय महिला, सैदापूर येथील 22 वर्षीय महिला, येळगाव येथील 26 वर्षीय पुरूष, कळंत्रेवाडी उंब्रज येथील 73 वर्षीय पुरूष, कृष्णा हॉस्पिटल येथील 29 वर्षीय पुरूष, 25 वर्षीय पुरूष, 29 वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’