गणपतीने मोरावर आरूढ होऊन ‘असा’ केला बलशाली सिंधूचा वध | अख्यायिका मयूरेश्वराची

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या गणेशोत्सवकडे सर्वाचे लक्ष्य असून दिवाळीपूर्वीचा हा हिंदूंचा सर्वात मोठा सण मानला जातो. संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यातही महाराष्ट्रात ८ मानाचे गणपती आहेत. त्यालाच अष्टविनायक असे म्हणतात. गणपतींच्या या ८ वेगवेगळ्या मूर्त्यांना मानाचे स्थान आहे. या आठही गणपती मंदिराच्या वेगवेगळ्या आख्यायिका प्रसिद्ध आहेत.

चिंतामणी, मयुरेश्वर, सिद्धिविनायक, महागणपती, विघ्नेश्वर, गिरिजात्मक, वरदविनायक बल्लाळेश्वर या अष्टविनायक पैकी पहिला मानाचा गणपती म्हणजे मोरगावचा मयुरेश्वर आहे. श्री मयुरेश्वर हा पुणे जिल्हाल्यातील बारामती तालुक्यातील मोरगाव येथे आहे. हे ठिकाण पुण्यापासून सुमारे ७० कि. मी. अंतरावर आहे. गावच्या मध्यभागी असणाऱ्या या मंदिराला चारही बाजुंनी मनोरे असून हे मंदिर काळया दगडात बांधलेले आहे. हे या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्ये आहेत.

मयूरेश्वराची मूर्ती :

मयूरेश्वराच्या मंदिराच्या गाभाऱ्यात मयूरेश्वराची विलोभनीय मूर्ती आहे. ही मूर्ती बैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अतिशय आकर्षक अशी आहे. या मूर्तीच्या डोक्यात आणि बेंबीत हिरे बसवले आहेत. मूर्तीच्या मस्तकावर नागाचा फणा आहे. तसेच त्या गणपतीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला रिद्धी-सिद्धी यांच्या पितळी मूर्ती असून मूषक म्हणजे उंदीर आणि मोर आहे.

मयूरेश्वराची आख्यायिका :

आख्यायिकेनुसार मिथिला येथे गंडकी नगरीचा राजा चक्रपाणी राज्य करत होता. त्याला मुलबाळ होत नसल्याने त्याच्या पत्नीने सूर्याची उपासना केली. त्यानंतर या राजाला पुत्र प्राप्ती झाली. त्या पुत्राचे नाव सिंधू असे ठेवण्यात आले. त्या मुलाचे तेज इतके होते की त्या राणीला त्या पुत्राला समुद्रात सोडावे लागले.

सिंधू जसजसा मोठा होत गेला तसतसा तो अधिकाधिक बलशाली होत गेला. सूर्याची उपासना करून त्याचा जन्म झाल्यामुळे त्याला अमरत्वाचा वर प्राप्त झाला. त्यानंतर त्याने आपल्या शक्तीच्या बळावर पृथ्वीवर उत्पात माजवायला सुरुवात केली. मग त्याचा विनाश करणे तर भाग होते. मग त्याचा विनाश करण्यासाठी गणपतीला मोरावर आरुड होऊन यावे लागले. व याच ठिकाणी गणपतीने सिंधूचा वध करून त्याचे मुंडके छाटले. त्यामुळे इथे मयुरेश्वराची मूर्ती स्थापण्यात आली.

या मंदिरात प्रवेश करताच ६ फूट उंच दगडी उंदीर आणि बसलेल्या नंदीचे दर्शन होते. नंदीचे तोंड गणपतीकडे असून गणपती समोर नंदी असणारे हे एकमेव मंदिर आहे. कारण नंदी हा फक्त महादेवाच्या मंदिरात असतो. मात्र या मंदिरात उंदीर आणि नंदी या दोन्ही मूर्ती असून या मूर्ती जणू महादेवाच्या पहारेकरीच आहेत असे वाटते.

Leave a Comment